मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबई-अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरु होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाचा मार्ग पुन्हा खुला होणार आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यानची फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगडला जोडणारा जलमार्ग पुन्हा गजबजणार असून, प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईला अलिबागशी जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा सागरी मार्ग मानला जातो. मात्र, पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे या मार्गावरील जलवाहतूक साधारण तीन महिने बंद ठेवली जाते. या काळात अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. त्यामुळे फेरीबोट सेवा पुन्हा कधी सुरू होणार, याकडे प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष लागले होते.
Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य
वर्षाला १५ लाख प्रवाशांचा जलप्रवास
मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर वर्षातील सुमारे नऊ महिने मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. उपलब्ध माहितीनुसार, या मार्गावरून दरवर्षी सुमारे १५ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो यांसारख्या कंपन्यांच्या प्रवासी फेरीबोटी या मार्गावर सेवा देतात. साधारणपणे दर अर्ध्या तासाने मांडवा बंदरातून फेरीबोट सुटते. गर्दीच्या काळात फेऱ्यांची संख्या वाढवली जाते.
स्पीडबोट आणि रो-रो सेवांच्या तुलनेत फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा असल्याने या सेवेवर मोठ्या प्रमाणात प्रवासी अवलंबून आहेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलिबाग व मुरुड परिसरातील अनेक प्रवासी मुंबईला जाण्यासाठी जलमार्गाला पसंती देतात.
NCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी
पर्यटनाला मिळणार नवी चालना
गेटवे ऑफ इंडिया परिसराचा झगमगाट, समुद्रातील प्रवास आणि बोटीच्या मागे येणाऱ्या सीगल पक्ष्यांचा थवा यामुळे हा जलप्रवास पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. कमी खर्चात समुद्रसफरीचा अनुभव मिळत असल्याने मुंबईतील पर्यटकांकडून या मार्गाला विशेष पसंती दिली जाते.
१ सप्टेंबरपासून जलमार्ग खुला झाल्यानंतर मुंबईहून अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचा थेट फायदा अलिबागसह मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन वाहतूक आणि इतर व्यावसायिकांना होण्याची शक्यता आहे.
सुरक्षा तपासणीनंतरच जलवाहतूक
मेरीटाईम बोर्डाच्या निर्णयानुसार, १ सप्टेंबरपासून मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. खराब हवामानाचा अडथळा निर्माण होत नसल्यास दिवसा या मार्गावर जलवाहतूक सुरू राहणार आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी संबंधित फेरीबोटींची आवश्यक डागडुजी करून घेण्याबरोबरच सुरक्षा साधनांची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Crime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हाफेरीबोट सेवा पुन्हा सुरू होत असल्याने मुंबई आणि रायगडमधील प्रवास अधिक सोयीचा होण्याबरोबरच आगामी पर्यटन हंगामालाही चांगली सुरुवात मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा