Mumbai Ganeshotsav 2026: मुंबईत २०१२ मध्ये २७ कृत्रिम तलाव होते. २०२२ मध्ये १५४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. २०२३ मध्ये हीच संख्या १९१ पर्यंत पोहोचली. तर २०२४ मध्ये २०४ कृत्रिम तलाव उभारले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गेल्या वर्षी सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींबरोबरच एमपीसीबीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यंदाही उच्च न्यायालयाच्या २४ जुलै २०२५ च्या आदेशाचे पालन करणेच बंधनकारक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आगमन-विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.
Maharashtra FDA: एफडीएला पुन्हा चपराक, उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे, दोन प्रकरणांत नामुष्कीगेल्या वर्षी २९८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. यंदा ३५५ पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समुद्र किनाऱ्यांवर विसर्जन होतानाच २३ नैसर्गिक तलावही विसर्जनासाठी उपलब्ध आहेत. कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी सहा फुटांपर्यंतच्या पर्यावरणपूरक ७२ हजार ३६१ मूर्तींचे, तर ६ फुंटापर्यंतच्या १ लाख ११ हजार ६४१ पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. २०२४ मध्ये ४० टक्के, तर २०२५ मध्ये ९८ टक्के या उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले होते.
महापालिकेकडून १ हजार १२७ मूर्तिकारांना ऑनलाइन वन विंडो प्रणालीद्वारे मंडप परवानग्या उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ७६० टन शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. विभागनिहाय एकूण २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मूर्तिकारांना विनामूल्य वितरित करण्यात आले.
आगमन-विसर्जनाची तयारी
यंदा आगमन व विसर्जन मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या २८१ ठिकाणच्या केबल्स काढून टाकण्यात आल्या आहेत. तर, एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे व १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आगमन-विसर्जन मार्गावरील ४९२ ठिकाणी वृक्षछाटणीही करण्यात आली आहे.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान टप्याटप्याने वाहतूक ब्लॉकमहापालिकेकडून सज्जता
सोसायट्यांबरोबरच चौपाट्यांलगतही कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. वाहनांवर फिरत्या कृत्रिम तलावांची सुविधाही उपलब्ध होणार आहे. गणेशभक्तांना प्रभाग स्तरावर गुगल मॅपच्या साह्याने विसर्जनस्थळांची ठिकाणे तसेच विसर्जनासाठी उपलब्ध वेळेच्या स्लॉटची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनस्थळाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात येईल.
