• Thu. Aug 27th, 2026

नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 27, 2026

*आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क

*नातेवाईक व इतरांनी माहिती असल्यास देण्याचे आवाहन 

मुंबई, दि. २७: नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा चोवीस तास सतर्क आहे असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

मंत्री महाजन म्हणाले, प्रशासनाकडे ८० लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र तिथे मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळे देखील संपर्क होत नाही आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांचा शोध घेत आहे.

रिचार्ड टूर्स ट्रॅवल्स कंपनीच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानस सरोवर येथे गेले आहेत. त्यापैकी एका गाडीत जवळपास ३७ जण सुरक्षित आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे तेथील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्याने काही पर्यटकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. उर्वरित पर्यटकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांमधून या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांकडे यासंदर्भात अतिरिक्त माहिती असल्यास ती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी वेबसाइटही चोवीस तास खुली ठेवण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन –

या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ 

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
•नियंत्रण कक्ष +91-9321587143
•अधिकृत ई-मेल: [email protected]

महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन केले आहे.

००००

नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट – महासंवाद
Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी बापाची लेक, स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर ठेवलं, 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; मैत्रिणीच्या जबाबामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed