Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेऊन चाकण येथील समस्यांवर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पवार यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात चाकण परिसरातील विविध प्रश्न आणि चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.
Nana Patole: महाजेनकोत 10 हजार कोटींचा घोटाळा? नाना पटोलेंचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणीचाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आणि बाजूपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याचेही प्रशासनाने ठरविले आहे. ‘चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारपासून अतिक्रमणांवर कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही; म नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
Kolhapur Gokul Election : गोकुळच्या रणांगणात सतेज पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या भेटीमुळे नवा ट्विस्टनवी पोलिस ठाणे उभारण्याची कार्यवाही
‘उपाययोजनांमुळे कामगारांच्या ये-जा करण्याच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न आहे; तसेच संबंधित सर्व विभागांची दर शुक्रवारी बैठक घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले. आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, विविध प्रश्नांचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, पार्किंग, अतिक्रमण या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.-सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
