• Fri. Aug 21st, 2026

Mumbai News : मुंबईकर चॅम्पियन्सचा चाळीतून चॅम्पियनशिपपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास, आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक

Ravindra Chavhan : मुंबईतील चाळीत आणि सामान्य कुटुंबांत वाढलेल्या या सात खेळाडूंनी मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या प्रशिक्षणावर मात करत भूतानमध्ये पार पडलेली दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप गाजवली. सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली.

आमदार रविंद्र चव्हाण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात. सरकारी योजना आणि पक्षाच्या उपक्रमांसह विविध सामाजिक विषयांवरही रविंद्र चव्हाण सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होत असतात. आज मुंबईतील चाळीत वाढलेल्या ७ मुलांच्या असामान्य तरीही तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या कर्तृत्वाची त्यांनी दखल घेतली. मुंबईतील चाळीत आणि सामान्य कुटुंबांत वाढलेल्या या सात खेळाडूंनी मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या प्रशिक्षणावर मात करत भूतानमध्ये पार पडलेली दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप गाजवली. सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली.

सोशल मीडिया पोस्टद्वारे कौतुक

विराज भिलारे, गौरव सोनावणे, ऋग्वेद राहुल मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धाधम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे अशी या ७ विजेत्या खेळाडूंची नावे असून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, चाळीतील अरुंद जागा आणि सार्वजनिक मैदानांपासून आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी आहे. या सात चॅम्पियन्सच्या कर्तृत्वाचे आ. रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे कौतुक केले आहे. दुर्लक्षित राहिलेल्या या अभिमानास्पद यशाची दखल घेतल्याने रविंद्र चव्हाण यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद भूमिकेचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा