Tukaram Mundhe FDA bans Loose Edible Oil : सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले
तुकाराम मुंढे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग आयुक्त यांचे सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी आदेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी केली. सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते; तसेच तीन लाखांपासून दहा लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.
१२ प्रमुख त्रुटी
‘२०११ मध्ये ‘एफएसएसएआय’चा कायदा लागू झाला. त्यानुसार परवाना घेणे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. तपासणीदरम्यान १२ प्रमुख त्रुटी आढळल्या. अनेक खाद्यतेल उत्पादकांकडे परवाना किंवा नोंदणी नाही. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळली असून, ॲसिडिक घटक आणि औद्योगिक ट्रान्सफॅटही आढळले आहेत. तेलाचा खरा स्रोत; तसेच उत्पादन दिनांक लपविण्यात येतो. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकले जात असल्याचेही समोर आले आहे,’ असे तुकाराम मुंढे म्हणाले.
Nashik Crime : नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला
खाद्यतेलाबाबत विशेष आदेश
मुंढे यांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी ॲगमार्कशिवाय तेलविक्री केली जाते. सुट्या स्वरूपात खाद्यतेल विकले जाते. फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेष्टनाचा वापर केला जातो. घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच खाद्यतेलाची वाहतूक करण्यात येते; तसेच गंजलेल्या कॅनमध्ये तेलाचे पुन्हा पॅकिंग केले जाते. सन २०२५-२६ मध्ये एक हजार २४७ खाद्यतेल नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एक हजार १४२ नमुने प्रमाणित आढळले, ७७ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले; तसेच १३ नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खाद्यतेलाबाबत विशेष आदेश काढण्यात आल्याचे मुंढे म्हणाले.
नागरिकांना आवाहन
आता उत्पादकांसाठी नोंदणी आणि परवाना बंधनकारक असेल. खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद स्वरूपातच करता येईल. सुटे तेल विकता येणार नाही. नागरिकांनीही सुटे खाद्यतेल खरेदी करू नये, असे आवाहन मुंढे यांनी केले.
Kolkata Fire : मोठ्या मुलीला घरी ठेवलं; पत्नी, मुलगा, सासऱ्यांसह लॉजवर राहिले, काळरात्री घात झाला, टीव्ही पत्रकाराचा कुटुंबासह अंत
गरिबांना फटका शक्य
या निर्णयाचा गोरगरीब नागरिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निम्न मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या नागरिकांना खाद्यतेल लिटरच्या हिशेबाने विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे ते रोजच्या वाणसामानासोबत आवश्यक तेवढेच तेल खरेदी करतात. या घटकांचा पुरेसा विचार न करता घाईघाईने हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काही सामाजिक संघटनांकडून होत आहे.
Amol Mahadik : तटकरेंच्या भाच्याला काँग्रेसकडून मोठी जबाबदारी, अमोल महाडिक यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्तीवापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांत खाद्यतेलाचे पॅकेजिंग केले जात असल्याचे प्रकार आढळले आहेत. त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे. तळणीच्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते वारंवार तापते आणि त्यातून हानिकारक ट्रान्सफॅट तयार होतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तळणीच्या तेलाचीही शुद्धता आणि दर्जा राखणे बंधनकारक करण्यात आल्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा