मागील काही काळापासून रखडलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पालकत्व स्वीकारल्यानंतर गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचे गोगावले यांनी आभार मानलेत. कुटुंब, मतदार आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याचे देखील त्यांनी नमूद केले.उशिरा का होईना, पण आपल्याला न्याय मिळाला, असे गोगावलेंनी म्हटले. मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभेच्छांची वाट पाहतोय, असेही यावेळी गोगावले म्हणाले.