• Tue. Aug 11th, 2026

    Accident News: भीषण! एंडेव्हर कारसह चार वाहनांची धडक; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात निलेश लंकेंनी जीवलग मित्र गमावला

    ​शिरूर : पुणे-अहमदनगर रस्त्यावर शिरूर शहरालगत असलेल्या संग्राम हॉटेलजवळ एका भयंकर अपघात झाला आहे. चार वाहनांच्या या अंगावर काटा आणणाऱ्या धडकेत दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची बस, एक फोर्ड एंडेव्हर कार, दुचाकी आणि अपघातग्रस्त कंटेनर अशा एकूण चार गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहनांची अवस्था पाहून या धडकेची भीषणता लक्षात येते. घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने गाडी तिथेच सोडून धूम ठोकली.

    या दुर्दैवी घटनेत एंडेव्हर कार चालवणारे आणि दुचाकीवरील व्यक्ती अशा दोघांनी जागीच अखेरचा श्वास घेतला. यामध्ये पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील नामांकित व्यावसायिक किशोर यादव यांचा मृत्यू झालं आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वाडेगव्हाण आणि संपूर्ण शिरूर पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूकही पूर्ववत केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घटनास्थळावरून पळून गेलेल्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

    किशोर यादव निलेश लंके यांचे जिवलग मित्र

    अपघातात मृत्यू झालेले किशोर यादव हे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची जवळचे सहकारी आणि जिवलग मित्र होते. यादव यांच्या अपघाताचे वृत्त समजताच निलेश लंके यांनी हळहळ व्यक्त केली आहे. “किशोरभाऊ आणि माझे नाते केवळ राजकीय किंवा सामाजिक कामापुरते मर्यादित नव्हते. एक जिवलग सहकारी म्हणून त्यांनी प्रत्येक प्रसंगी माझी साथ दिली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि आपुलकीच्या वागण्यामुळे ते सदैव माझ्या मनात विशेष स्थान ठेवून राहतील. आज त्यांना निरोप देताना मनात असंख्य आठवणी दाटून येत आहेत. एक जवळचा माणूस, विश्वासू सहकारी आणि जिवलग मित्र गमावल्याची पोकळी कधीही भरून निघणार नाही,” अशा भावना निलेश लंके यांनी व्यक्त केल्या आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Devendra Fadnavis: बावनकुळेंची पाठराखण, जरांगेंवर पलटवार; टीकेनंतर फडणवीसांनी आरक्षण प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिका
    Manoj Jarange Patil: मराठा नेत्यांच्या नाकावर टिच्चून बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रं रद्द केली, मराठा असल्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जरांगेंनी फटकारलं!
    सिडको, सातपूर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम गतीने पूर्ण करा; नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed