Nashik Crime: याप्रकरणी मयताची बहीण सुनीता दत्तात्रय वाकचौरे (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता मधुकर जाधव (वय ४५) या तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होत्या. रविवारी गावातीलच आव्हाड यांच्या मालकीच्या नारळाच्या बागेतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. हात-पाय बांधलेले आणि गळ्याला साडी बांधलेल्या स्थितीत मृतदेह असल्याने नातेवाइकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
Swine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्हदरम्यान, संशयितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या संघटनेने सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच वावी पोलिस ठाण्यातही निवेदन दिले.
Hemlata Patil : चार महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला, NCP नगरसेविका हेमलता पाटलांचा संताप, काम बंद पाडत जाब विचारलासंशयित ताब्यात; साथीदाराचा शोध
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. तपासादरम्यान निफाड तालुक्यातून अनिल पगारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके आणि पोलिस हवालदार शहाजी शिंदे यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.
