• Fri. Jul 17th, 2026

    Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांचं मोठं पाऊल; वाहतूक पोलिसांना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक, निर्णयामागील कारण काय?

    Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांचं मोठं पाऊल; वाहतूक पोलिसांना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक, निर्णयामागील कारण काय?

    नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटना, नाकाबंदीदरम्यान होणारा प्रतिकार आणि कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने लक्षात घेऊन नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शहरातील वाहतूक शाखेतील पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीदरम्यान ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेला बळ मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे.

    नागपूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम, ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई तसेच वाहतूक नियंत्रणादरम्यान वाहतूक पोलिसांना अनेकदा गुन्हेगार, संशयित किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. काही घटनांमध्ये पोलिसांवर धक्काबुक्की, मारहाण तसेच जीवघेणे हल्ले झाल्याचे प्रकार झाले आहे.

    या आदेशानुसार ड्युटीवर असताना पात्र वाहतूक पोलिसांनी लाठीसोबतच ‘सर्व्हिस गन’ही सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. मात्र, शस्त्राचा वापर केवळ अत्यावश्यक आणि कायदेशीर परिस्थितीतच करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पोलिसांच्या आत्मसंरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक परिणाम होईल. यापूर्वी पोलिस आयुक्तांनी नागपूर वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीदरम्यान ‘नीट अँड क्लीन’ राहण्याचे निर्देश दिले होते. स्वच्छ गणवेश, शिस्तबद्ध वर्तन आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद यावर भर देण्यात आला होता.

    यासोबतच काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी शहरातील डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही ड्युटीदरम्यान ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’ सोबत ठेवण्याचे निर्देश दिले होते. गेल्या काही महिन्यांत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर संपूर्ण पोलिस दलाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध शाखांतील अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात येत आहेत.

    नागपूर शहरात मंजूर पदसंख्या ८४३ असली तरी प्रत्यक्षात दररोज सुमारे ५२० वाहतूक पोलिस रस्त्यावर वाहतूक नियंत्रण, नाकाबंदी आणि विशेष मोहिमांमध्ये कार्यरत असतात. शहरातील २० लाखांहून अधिक वाहनांचा ताण आणि १७१ सिग्नलयुक्त चौकांवरील जबाबदारी लक्षात घेता वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताणही मोठा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय पोलिस दलासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासही त्याची मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed