• Wed. Jul 15th, 2026
    TET Paper Leak : TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क

    Thane TET Paper Leak Case : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. तसेच, फेरपरीक्षेची तारीख तातडीने जाहीर करण्याची आणि या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली.

    टीईटी पेपरफुटी प्रकरण बिजेंद्रकुमार गुप्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    महेश गायकवाड, ठाणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकरणात, फुटलेला पेपर तब्बल पाच हजार परीक्षार्थींना विकण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, हा पेपर पुढे कितीही चढ्या किंमतीने विकला गेला, तरी प्रत्येक पेपरच्या विक्रीमागे ७० हजार रुपये या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याला हवे होते, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. फरारी असलेल्या मुख्य सूत्रधार गुप्ता आणि त्याचा साथीदार सोनूकुमार किशनलाल यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवत आहेत.

    बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक

    या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून सुरू असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक झाली आहे. पेपरविक्रीसाठी आलेल्या तिघांना सुरुवातीला पोलिसांनी अटक केली होती; नंतर बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक झाली. अटकेतील आरोपींपैकी मिथुनकुमार सिंह हा गुप्ताचा साडू आहे. आग्रा येथील छापखान्यातून टीईटीचा पेपर फुटल्याची बाब तपासात उघड झाल्यानंतर, पोलिसांनी या छापखान्यात पॅकेजिंग विभागात काम करणारे नरेशकुमार मेहोर, बाबूलाल कुशवाह यांच्यासह माजी कर्मचारी संजयकुमार शर्मा यांना अटक केली. यानंतर, आणखी दोन आरोपींना अटक झाली. मात्र, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता आणि आग्रा येथील सोनूकुमार किशनलाल अद्याप फरारी आहेत.
    Maharashtra TimesPune News: धक्कादायक! मोशीतील दुर्घटनेप्रकरणी जखमींवरच गुन्हा दाखल; राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी लाजीरवाणी भूमिका?
    आग्रा येथील छापखान्यातून हा पेपर फुटला असून या छापखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. छापखान्यातील डीव्हीआर ताब्यात घेण्यात आला. छापखान्यातून पेपर फोडण्यामध्ये नरेशकुमार, बाबूलाल यांचा सक्रिय सहभाग असून, नंतर पेपर बिजेंद्रकुमार गुप्ता याच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. बाबूलालने पेपर दिल्यानंतर नरेशकुमारने तो बुटामध्ये लपवून छापखान्यातून बाहेर नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कामासाठी बिजेंद्रकुमारने आरोपींना काही प्रलोभने दाखवली होती.

    थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांना आमिष

    टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे परराज्यापर्यंत पसरल्याचे याआधीच उघड झाले आहे. मात्र, आरोपी थेट जिथे पेपर छापले जातात, त्या छापखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपर्क साधत असत. त्यांना आमिष दाखवून किंवा ‘मॅनेज’ करत छापखान्यातून पेपर बाहेर काढणे आणि नंतर पेपरची विक्री करणे अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचे सहायक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले. अशाच पद्धतीचे रॅकेट उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्लीमध्ये सक्रिय असल्याची शक्यता आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा

    हे भाजप सरकारचे अपयश : वर्षा गायकवाड

    टीईटी पेपरफुटीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, आता यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘हा पेपर फुटलाच कसा, याचे उत्तर देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असताना, ते राजकीय पतंगबाजी करत आहेत. पेपर फुटलाच कसा, याचे आधी उत्तर द्या व अजून परीक्षा का घेतली नाही, यावर बोला,’ अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केली. पेपरफुटी हे भाजप सरकारचे अपयश असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा