महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत कायापालट करण्यात आला आहे. अतिशय सुंदर आणि प्रवाशांना खूप सोयी सुविधा मिळतील असा या स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा : भारतीय रेल्वेच्या दूरदर्शी ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर अशा स्थानकात पुनर्विकास करण्यात आला आहे. १०.६३ कोटी रुपये खर्च करून या स्थानकाचा दर्जा सुधारण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली असून संरक्षा, सुलभता आणि प्रवासाचा एकूण अनुभव अधिक चांगला झाला आहे. हावडा-नागपूर-मुंबई या महत्त्वाच्या मुख्य मार्गावर स्थित असलेले नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यासाठी रेल्वेचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. तसेच, प्रवासी, कृषी बाजारपेठा आणि उद्योग यांना देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यात हे स्थानक महत्त्वाची भूमिका बजावते.
नांदुराचे ऐतिहासिक महत्त्व
नांदुरा हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज सरासरी ४,५४५ प्रवासी प्रवास करतात आणि येथून २६ गाड्यांची ये-जा होते; हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून याचे महत्त्व यावरून अधोरेखित होते.
नांदुरा रेल्वे स्थानक अधिकृतपणे १८८८ मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या काही दशकांत नांदुरा शहराच्या विकासासोबतच या स्थानकाचाही सातत्याने विकास झाला असून, या भागातील प्रवाशांची ये-जा तसेच कृषी आणि व्यावसायिक उपक्रमांना यामुळे चालना मिळाली आहे.
नांदुरा शहर या परिसरासाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरले आहे. हावडा – मुंबई रेल्वे मार्गावर स्थित असल्याने, येथून प्रमुख प्रवासी, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांची वाहतूक होते, ज्यामुळे प्रवाशांना भारतातील प्रमुख शहरांशी जोडले जाते.
जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ
नांदुरा ही जिल्ह्याची एक प्रमुख कृषी बाजारपेठ आहे; येथून गहू, सोयाबीन, कांदा आणि कापूस यांची वाहतूक करून स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या शहरांशी जोडले जाते. तसेच, तेल गिरण्या आणि डाळ प्रक्रिया युनिट्स यांसारख्या स्थानिक उद्योगांना कच्चा माल आणि तयार उत्पादनांच्या वाहतुकीद्वारे हे स्थानक मदत करते. याव्यतिरिक्त, नांदुरा येथील उच्च दर्जाचा खवा (आटवलेले दूध) प्रादेशिक स्तरावर प्रसिद्ध आहे आणि त्याची दररोज शेजारच्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक केली जाते.
शहरात वारकरी संप्रदायाची परंपरा
हे शहर महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा दर्शवते. ज्ञानगंगा नदीमुळे नांदुरा बुद्रुक आणि नांदुरा खुर्द अशा दोन भागांत विभागलेल्या या शहरात प्राचीन अंबादेवीगड यांसारखी ऐतिहासिक स्थळे आहेत आणि येथे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा दिसून येते.
शहरात अनेक धार्मिक स्थळ
नांदुराचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे १०५ फूट उंच असलेली हनुमानाची भव्य मूर्ती; ही भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक असून ती भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. येथील इतर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये शनि महाराज मंदिर, खंडोबा मंदिर आणि निंबा देवी मंदिर यांचा समावेश होतो. तसेच, परिसरातील इतर आकर्षणांमध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर (शेगाव – ३३ किमी), ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य (३० किमी) आणि लोणार विवर सरोवर (९४ किमी) यांचा समावेश असून, यामुळे या भागाची पर्यटन क्षमता अधिक वाढली आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुनर्विकास
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत, प्रवाशांची सोय, सुलभता, सौंदर्य आणि कार्यक्षमता यांवर लक्ष केंद्रीत करून नांदुरा रेल्वे स्थानकाचा सर्वसमावेशक पुनर्विकास करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या प्रमुख कामांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
आधुनिक स्थानक इमारत
नवीन आणि प्रशस्त आरक्षण कार्यालय
चार आरक्षण कक्ष
प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षा कक्ष
पुरुष, महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे
छतासह प्रवेशद्वार
सुधारित परिसंचरण क्षेत्र
जुने आरक्षण कार्यालय पाडणे
९ मीटर रुंद नवीन प्रवेश/निर्गमन द्वाराचे बांधकाम
१,३०७ चौरस मीटर क्षेत्राचा विकास दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा
संरक्षक भिंतीचे बांधकाम
प्रवाशांसाठी सुविधा
नूतनीकरण केलेले प्रतीक्षा कक्ष
आधुनिक प्रसाधनगृहे
व्हिट्रिफाइड फरशी
आधुनिक शैलीतील छत फिनिशिंग
वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष
पिण्याच्या पाण्याचे कुलर्स
प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षा कक्षांमध्ये टिकाऊ फर्निचर
प्लॅटफॉर्म वरील पायाभूत सुविधा
प्लॅटफॉर्मवरील नवीन छप्पर:
फलाट क्रमांक १ – १६० मीटर लांब
फलाट क्रमांक २ – २२४ मीटर लांब
संरक्षा आणि सुलभता
प्रमाणित स्टेशन फलक
शोभिवंत प्रकाशयोजना
ध्वजारोहणासाठी विशेष खांब
पारंपारिक ओव्हरहेड वायरिंगऐवजी बस ट्रंकिंग प्रणाली
दृष्टीहीन प्रवाशांसाठी मार्गदर्शक पट्टे
कमी उंचीचे आरक्षण कक्ष
दिव्यांगांसाठी अनुकूल प्रसाधनगृहे
कमी उंचीवरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा
दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग
प्रमुख वैशिष्ट्ये:
पुनर्विकसित स्टेशनवर आता खालील सुविधा उपलब्ध आहेत:
आधुनिक आरक्षण कार्यालय
प्रवाशांसाठी सुधारित सुविधा
प्रतीक्षेसाठी उत्तम सोय
सुधारित स्वच्छता आणि आरोग्यव्यवस्था
स्टेशनवरील सुधारित प्रकाशयोजना
प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी उत्तम व्यवस्था
आधुनिक फलक
दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश/सुलभता
स्टेशनचे सुधारित सौंदर्य
प्रवाशांना होणारे फायदे
या पुनर्विकासामुळे खालील गोष्टी उपलब्ध होतील:
प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ
सुधारित संरक्षा आणि सुरक्षितता
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उत्तम सुलभता
प्रतीक्षेसाठी आधुनिक सुविधा
सुधारित स्वच्छता व्यवस्था
प्रवाशांच्या हालचालीसाठी उत्तम व्यवस्था
गर्दीत घट
स्टेशनच्या वातावरणात सुधारणा
सोयीस्कर पार्किंग आणि प्रवेश
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत स्थानकाचा कायापालट
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील १५ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी सावदा, धुळे, देवळाली, मूर्तिजापूर आणि लासलगाव ही पाच स्थानके यापूर्वीच राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहेत. आता या कार्यक्रमाद्वारे ‘नांदुरा’ स्थानक राष्ट्राला समर्पित केले जात असून, यामुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात आहे.
रेल्वे प्रवासाच्या एका नवीन युगाकडे
नांदुरा रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा आधुनिक, सर्वसमावेशक, सुलभ आणि प्रवासी-केंद्रीत रेल्वे स्थानके उभारण्याच्या भारतीय रेल्वेच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या या स्थानकामुळे केवळ हजारो दैनंदिन प्रवाशांचा प्रवास अनुभवच सुधारणार नाही, तर प्रादेशिक संपर्कक्षमता बळकट होईल, स्थानिक व्यापाराला चालना मिळेल आणि पर्यटनाचाही विकास होईल; ज्यामुळे या क्षेत्राच्या आर्थिक विकासात मोलाची भर पडेल.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा