• Sun. Sep 13th, 2026

शिक्षण-व्यवहार मराठीतच, तरी जात पाहून सक्ती; सोलापुरात मुस्लिम रिक्षाचालकांचे आंदोलन

ByMH LIVE NEWS

Jul 8, 2026 #mt
शिक्षण-व्यवहार मराठीतच, तरी जात पाहून सक्ती; सोलापुरात मुस्लिम रिक्षाचालकांचे आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे.येत्या १६ ऑगस्टपासून याबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.सोलापुरातील आरटीओ कार्यालयात मंगळवारी मराठी भाषेबाबत कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमात ज्योती ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मुस्लिम रिक्षा चालक नाराज झाले आहेत.मराठी वगळता मुस्लिम समाजातील व्यक्तींना मराठी भाषा प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे त्या म्हणाल्या.ज्योती ठाकरेंच्या वक्तव्याने मराठी बोलणारे मुस्लिम रिक्षा, टॅक्सी चालक संतापले आहेत.जातीच्या आधारावर मराठी प्रमाणपत्र देऊ नका, असे मुस्लिम रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.सर्व रिक्षा चालक संघटनांनी एकत्रित येऊन आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed