Mumbai Pune ST Shivneri Bus : अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
वाहतूक बंद, शिवनेरीला फटका
मुंबई-पुणे हे अंतर चार तासांत पूर्ण करणारी वातानुकूलित सेवा अशी एसटीच्या शिवनेरीची ओळख आहे. यामुळे साध्या एसटीपेक्षा शिवनेरीचे प्रवास भाडेही अधिक आहे. अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला. सोमवारी सकाळी ९ वाजता दादरवरून औंधमार्गे पुणे शिवनेरी रवाना झाली. त्यानंतर एकही शिवनेरी पुण्यासाठी रवाना झाली नाही. पुण्याहून सोमवारी सकाळी सात वाजता निघालेली शिवनेरी दुपारी चार वाजता दादरमध्ये दाखल झाली.
पुढील सूचनेपर्यंत शिवनेरी फेऱ्या रद्द
एरव्ही चार तासांत पोहोचणाऱ्या शिवनेरीला दादरमध्ये येण्यासाठी आठ तासांचा वेळ लागला. प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी मिसिंग लिंक आणि मुंबई-पुणे रस्तेमार्ग पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत शिवनेरीच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक
रायगड विभागातील अनेक फेऱ्या रद्द
सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड विभागातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव या आगारांतील एकूण ७३७ एसटी फेऱ्या आणि दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, रत्नागिरी, लांजा, राजापूर, मंडणगड यांच्या एकूण ६८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
Missing Link वर दरड कोसळली, Supriya Sule यांनी फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्याची करून दिली आठवण
कारवाईच्या धास्तीने कर्मचाऱ्यांत भीती
दुसरीकडडे, राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाल्याने आता वाहक, चालकांसह कर्मचारीही धास्तावले आहेत. कर्मचारी किंवा वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या स्तरावरील दुर्लक्षाची शिक्षा वरिष्ठांना भोगावी लागल्याचा संदेश या कारवाईतून सर्वदूर पसरला आहे. त्यामुळे राज्यभरातील कमर्चाऱ्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी यापुढील काळात धारेवर धरले जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिकमधील अकरा अधिकाऱ्यांवर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांपर्यंतच्या वेगवेगळ्या पदांवरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हलगर्जीपणा, आर्थिक नुकसानीसह महामंडळाची प्रतिमा मलीन करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.
Siya Goyal : केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड
कारवाई मागे घ्यावी, सरनाईकांना निवेदन
आगार व्यवस्थापकांच्या अख्त्यारितील कामांमध्ये राहिलेल्या त्रुटींकरिता थेट प्रादेशिक अभियंता, यंत्र अभियंता, लेखा अधिकारी, विभागीय भांडार अधिकारी, विभागीय कर्मवर्ग अधिकारी, विभागीय अभियंत्यांसारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. केवळ नाशिकमध्येच नाही, तर यापूर्वी रायगड, सातारा, जळगाव, कणकवलीतही काही अधिकारी निलंबित झाले. या अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याची कर्मचाऱ्यांचीही भावना असून, कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी बहुजन परिवहन अधिकारी, कर्मचारी संघटनेने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन केली आहे.
