• Mon. Jul 6th, 2026

    नाशिककरांनो सावधान! तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? 17 लाखांचा पावडरसाठा जप्त, FDAची मोठी कारवाई

    नाशिककरांनो सावधान! तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? 17 लाखांचा पावडरसाठा जप्त, FDAची मोठी कारवाई

    Nashik FDA Raid: शहा, कारवाडी आणि पुतळेवाडी परिसरात पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भेसळ व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली.

    नाशिक एफडीए कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सिन्नर : दूध भेसळीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सिन्नर तालुक्यात शहा आणि परिसरातील गावांमध्ये धडक कारवाई करीत संशयित भेसळ रॅकेटला मोठा हादरा दिला.

    तालुक्यातील रामपूर-पुतळेवाडी येथे शनिवारी (दि. ४) रात्री राबविण्यात आलेल्या गुप्त मोहिमेत तब्बल १७ लाख ३७ हजार ५२९ रुपयांचा दूध पावडरचा विनापरवाना साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रशांत रोहिदास काळे (वय २३, रा. रामपूर-पुतळेवाडी) याच्याविरुद्ध वावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात मोहीम छेडली आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एफडीए’चे पथक शनिवारी सिन्नरच्या पूर्व भागात दाखल झाले.

    Maharashtra TimesNashik FDA Raid: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; दोन दिवसांत 7 हॉटेलांचे परवाने तत्काळ निलंबित, काय कारण?
    अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत काळे याने कोणताही वैध अन्न परवाना अथवा खरेदी-विक्रीची कागदपत्रे नसताना मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा केला होता. हा साठा दूध भेसळीसाठी वापरला जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक प्रमोद सरोवर अधिक तपास करीत आहेत.

    ‘मोठे मासे’ रडारवर ?
    ‘एफडीए’च्या पथकाने दूध भेसळीशी संबंधित आणखी काही ठिकाणांची तपासणी केल्याची चर्चा आहे. काही खवा उत्पादन केंद्रांवरही कारवाई झाल्याची माहिती समोर येत असून, दूध भेसळीच्या साखळीतील काही ‘मोठे मासे’ प्रशासनाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

    Maharashtra Timesआषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’; Emergency स्थितीत वेळेत उपचार मिळणार, आरोग्य विभागाचा निर्णय
    पुण्यातही दूध भेसळीवर कारवाई
    मंचर, आंबेगाव, शिरूर परिसरांत दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दूध आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेसळीमध्ये जिल्ह्यातील दोन मोठ्या कंपन्यांसह अन्य काहींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यासह विभागात कारवाई सुरू असल्याने लवकरच याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, असे ‘एफडीए’ प्रशासनाने सांगितले. मंचर हे भेसळीचे मुख्य केंद्र असल्याचे तपासातून समोर आले आहे. मंचरमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एफडीए प्रशासनाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा