• Sun. Jul 5th, 2026

    Raj Thackeray: तुम्ही काहीच बोलत नाही, तुमच्या मौनामुळे ते अधिकच बेफाम होतायत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले!

    Raj Thackeray: तुम्ही काहीच बोलत नाही, तुमच्या मौनामुळे ते अधिकच बेफाम होतायत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले!

    Raj Thackeray Letter Devendra Fadnavis: या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ‘सत्तेचा माज’ आल्याची भावना देशभरात व्यक्त होत असून, त्याच प्रवृत्तीचा संसर्ग महाराष्ट्रातही झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहिले आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तडा जात असल्याची खंत व्यक्त करीत, तुमच्याकडून काही संकेतांची अपेक्षा आहे. मौन सोडा; अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

    मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

    महाराष्ट्राचे राजकारण विचार, सुसंस्कृतपणा आणि राजकीय उमदेपणासाठी देशभर ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परंपरा ढासळताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    Maharashtra TimesMumbai Rain: मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्ते उखडले; BMCच्या डांबरीकरणासह तात्पुरता मुलामा केलेल्या कामाचे पितळ उघडे
    संवेदनशीलतेबाबतच शंका
    ‘तुमचे मंत्री सातत्याने बेताल विधाने करीत आहेत, काही नेते उघडपणे असंवेदनशीलता दाखवत आहेत; मात्र त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काहीच बोलत नाही. तुमच्या मौनामुळेच ते अधिक बेफाम होत आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. ‘देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, अशी महाराष्ट्राची आणि माझीही धारणा होती. मात्र, अशा घटनांवर तुमच्याकडून साधा खेदही व्यक्त होत नसल्याने त्या संवेदनशीलतेबाबतच शंका निर्माण होते,’ असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
    Maharashtra TimesNavnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
    सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक
    महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वांत प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा