• Wed. Aug 26th, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन – महासंवाद

पंढरपूर, दि-०४ :- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार  यांनी आज श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने  मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी  आमदार दिलीप वळसे पाटील,  नगराध्यक्ष प्रणिती भालके, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या  कामांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed