Anil Parab On Sachin Ahir: अहिर यांनी ऐनवेळी शिवसेना उबाठाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उपसभापतिपदाचा अर्ज भरून सर्वांनाच धक्का दिला होता.
अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशीष शेलार, प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या अभिनंदनपर भाषणे केली. त्यानंतर भाई जगताप बोलण्यास उभे राहिले परंतु, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडकेही उभे राहिले. तेव्हा भाई जगताप आणि अनिल परब संतापले. उपसभापतिपदासाठी अभिनंदन करण्यासाठीही आता लाचारी करायची का, असा प्रश्न त्यांनी केला. या दोघांचाही आक्रमक पवित्रा पाहता सभापती राम शिंदे यांनी अनिल परब यांना बोलायला पाचारण केले.
Ajinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून भाषणे झाली. परंतु, विरोधी पक्षाकडून कोणालाही बोलू दिले जात नसल्याचे पाहून भाई जगताप यांनी आता अभिनंदनासाठीही लाचारी पत्करायची का, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला परब यांनीही पाठिंबा दिला. दोघेही संतापलेले पाहून सभापतींनी दोघांना बोलण्याची संधी दिली.
Sachin Ahir: विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही
विरोधक संख्येने कमी असूनही महायुतीला व्हिप काढावा लागला यावरूनच त्यांनाही भीती आहे, हे स्पष्ट झाल्याची कोपरखळी परब यांनी भाषणात मारली. सर्व घटनात्मक पदे विधिमंडळात आहेत, परंतु विरोधी पक्षनेतेपद भरले असते तर तुमची संसदीय कार्यमंत्री म्हणून कारकिर्द झळाळून निघाली असती, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना मारला.
सचिन अहिर यांचा बुलडोझर चालल्याने अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला, असे म्हणत शिवसेनेतील इच्छुकांनाही टोमणा मारला. तसेच, इथे क्लीन चिट मिळाली म्हणजे सगळे ठीक झाले, असे समजू नका, असा इशाराही परब यांनी अहिर यांना दिला.
