Crime News: सुखाने संसार सुरू असलेल्या या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग: करासवाडा-म्हापसा येथील साईनगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील रहिवासी असलेल्या पिता-पुत्राचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने अवघा जिल्हा हादरला आहे. या धक्कादायक व दुर्दैवी घटनेत पती आणि ७ वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला होता आणि गंभीर अवस्थेतील पत्नीवर गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू होते. या हृदयद्रावक आणि गूढ घटनेमुळे संपूर्ण गोवा राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजय जाधव (वय ३८) आणि अथर्व अजय जाधव (वय ७) अशी मृत पावलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. अजय यांच्या पत्नी सुवर्णा अजय जाधव (वय ३०) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावचे आहे. जाधव कुटुंब गेल्या वर्षभरापासून कामानिमित्त गोव्यात स्थायिक झाले होते. करासवाडा येथील साईनगर भागात एका भाड्याच्या खोलीत ते राहत होते. अजय जाधव हे पणजी येथील एका खासगी बँकेत नोकरीस होते, तर त्यांची पत्नी सुवर्णा या गृहिणी असून मुलगा अथर्व स्थानिक शाळेत शिक्षण घेत होता.
या घटनेची पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय आहे. शुक्रवारी रात्री अजय जाधव यांनी सोनुर्ली येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांशी फोनवर संपर्क साधला होता. मात्र, या संभाषणानंतर शनिवार सकाळपासून अजय यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. नातेवाईकांनी वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी थेट सोनर्लीहून गोव्यातील करासवाडा येथील खोली गाठली. वडिलांनी खोलीत जाऊन पाहिले असता समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अजय आणि नातू अथर्व हे दोघेही खोलीत निपचित अवस्थेत पडले होते. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून स्थानिक डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी केली असता बाप लेकाचा मृत्यू झाला होता तर सुवर्णा जाधव यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने अजय व चिमुरड्या अथर्वचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. हा कौटुंबिक विवंचनेतून किंवा अन्य कारणाने केलेला सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न होता, की या मृत्यूमागे विषबाधा अथवा अन्य काही गूढ कारण आहे, यादृष्टीने म्हापसा पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.
दरम्यान, हसते-खेळते जाधव कुटुंब उद्ध्वस्त झाले असून रविवारी दुपारी अजय आणि चिमुकल्या अथर्व या बाप-लेकाच्या मृतदेहावर सोनुर्ली येथील जाधववाडीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी दुपारी सुवर्णा जाधव यांचंही निधन झाल्यामुळे या मृत्यूचे कोडे सोडवणे म्हापसा पोलिसांसमोर आता मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे या तिघांच्याही मृत्यूचे गूढ कायम असून याप्रकरणी गोव्यातील म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा