• Sun. Jun 7th, 2026
    Devendra Fadnavis : ‘पार्थ पवार मला येऊन भेटले’, मुख्यमंत्र्यांकडून भेटीच्या वृत्ताला दुजोरा, नेमकी चर्चा काय?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी सुरु असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कथित घडामोडींची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. विविध माध्यमांमध्ये याबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित करण्यात येत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली जात आहे. या सर्व घडामोडींच्या दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र तथा राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच या भेटीवेळी नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबतही थोडक्यात माहिती दिली आहे.

    “पार्थ पवार मला काल येऊन भेटले. काही दोन-तीन प्रशासकीय विषय होते. काही राजकीय विषय होते. त्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की, आम्ही मित्रपक्ष आहोत. त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे, असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    राज्यात ऊर्जासंकट आहे का?

    “राज्यात कुठलेही ऊर्जा संकट नाही. आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा आज आपल्याकडे आहे. एखाद्या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी किंवा काही तासांसाठी संकट निर्माण होतं. बाकी राज्यात भरपूर वीज आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    मुख्यमंत्री कांदा प्रश्नावर काय म्हणाले?

    “आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाहीय, आखाती देशांमध्येही जात नाहीय, उत्पादन अधिक आहे, खरेदीदार कमी आहेत. त्यामुळेच कालपासून केंद्र सरकारने कांद्याची साडेबारा रुपये किलोने खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा निश्चित मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ”, अशीदेखील माहिती दिली.

    मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर काय म्हणाले?

    “राज्य सरकारने सातत्याने मराठा समाजाकरता अनेक गोष्टी केल्या आहेत. सारथी सारखी संस्था तयार करुन अनेक मराठा तरुण आयएएस, आयपीएस, एमपीएससी परीक्षांमध्ये उत्तम यश संपादीत करत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजाचे तयार केले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र काम सुरु आहे. कुठलीही योजना बंद नाही. प्रमाणपत्र पेंडिंग आहेत, अशीही परिस्थिती नाही. सगळे प्रमाणपत्र दिले जात आहेत”, अशी माहिती मुख्यंमंत्र्यांनी दिली.

    “जात पडताळणी प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली जाते. सातारा गॅझेटचा जो संबंध आहे, हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस हायकोर्टात चालू आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कंटेम्पट ऑफ कोर्ट होऊ नये या दृष्टीने आमच्या कायदेतज्ज्ञांनी जो सल्ला दिलाय त्यानुसार काम करतोय. कुठेही मराठा समाजाच्या योजना बंद केलेल्या नाहीत. जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी केलं, मला वाटत नाही की, महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या सरकारमध्ये झालेलं आहे”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा