Murder Case: गंभीर मारहाणीत शुभमचा जागीच मृत्यू झाला. स्वतःला वाचवण्यासाठी अतुलने भावाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता.
तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव, पण महिनाभराने गूढ उकललं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: तालुक्यातील मंगरूळ येथे काही दिवसांपूर्वी एका ३० वर्षीय युवकाचा दुचाकीवरून घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या अत्यंत चाणाक्ष आणि तांत्रिक तपासामुळे या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. हा अपघात नसून दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडण केल्याच्या रागातून सख्ख्या भावानेच भावाचा डोकं जमिनीवर आपटून खून केल्याचे उघडकीस आलं आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत शुभम हा सिल्लोड येथील एका खाजगी बँकेत नोकरीला होता आणि तो अविवाहित होता. तर आरोपी अतुल हा विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत. १० मे रोजी मंगरूळच्या शेतशिवारातील रस्त्यावर शुभम बालाजी खेळवणे हा दुचाकीवरून घसरून गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, घटनास्थळ आणि वाहनाची पाहणी करताना पोलिसांना दुचाकीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. तसेच शुभमच्या शरीरावर अपघातासारख्या जखमा नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या पथकाचा संशय बळावला.
नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी?
पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांची कसून चौकशी सुरू केली असता खरा प्रकार समोर आला. घटनेच्या दिवशी मृत शुभमने दारूच्या नशेत गावातील एका व्यक्तीशी वाद घालून शिवीगाळ केली होती. ही बाब त्याचा मोठा भाऊ अतुल बालाजी खेळवणे याला समजली. संतप्त झालेल्या अतुलने शुभमला घरी बोलावून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्याचे डोकं जोरात जमिनीवर आदळले.
आरोपी भावाला ३ दिवसांची पोलीस कोठडी
तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपी अतुलचा बनाव टिकला नाही आणि अखेर पोलिसांनी गुरुवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपी अतुल खेळवणे याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा