Solapur Crime: माढा तालुक्यातील एका ढोंगीबाबाचा नुकताच पर्दाफाश झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लोकांना भविष्य बदलण्याचे, जादूटोण्याचे आमिष दाखवून हा फसवणूक करत होता.
सोलापूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात नुकतेच मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आणखी एका ढोंगीबाबाचे बिंग फुटले आहे. आडेगाव येथे आश्रमाच्या नावाखाली काळाबाजार चालवणाऱ्या नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोकांचे भविष्य बदलण्याचे आणि जादूटोणा करण्याचे आमिष दाखवून हा भोंदूबाबा आपला गोरखधंदा चालवत होता. विशेष म्हणजे, अनेक बड्या राजकीय नेत्यांचा या बाबाच्या दरबारात सतत वावर असल्याने तो कोणाचीही भीती न बाळगता आपले फसवणुकीचे जाळे विणत होता.
या भोंदूबाबाच्या फसवणुकीचा आकडा आणि पद्धत अत्यंत धक्कादायक आहे. पंढरपूर तालुक्यातील एका व्यक्तीला त्याने पैशांच्या पावसाचे आमिष दाखवले होते. २०२४ सालापासून हा बाबा संबंधित व्यक्तीला ‘माझ्याकडचे कासव घेऊन जा. तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल आणि व्यवसायात अमाप फायदा होईल,’ अशी खोटी आश्वासने देत होता.
Crime News : भुकेनं व्याकूळ नऊ महिन्याचं लेकरु रडू लागलं, घरचे धावताच आईला बघून पायाखालची जमीन सरकली; छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं? बाबाच्या भूलथापांना बळी पडून या पीडित तरुणाने आतापर्यंत तब्बल पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम बाबाच्या चरणी अर्पण केली होती. मात्र, व्यवसायात कोणतीही प्रगती न होता उलट या तरुणावरील कर्जाचा डोंगर वाढतच गेला. आपली घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर या तरुणाने पोलिसांत धाव घेतली आणि या कथित गुरुमाऊली वीरकर विरोधात तक्रार दाखल केली.
या गंभीर तक्रारीची दखल घेऊन टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. आज पहाटेच्या सुमारास, आरोपी झोपेत असतानाच पोलिसांनी आडेगाव येथील आश्रमावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी मुख्य आरोपी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर या दोघांनाही झोपेतूनच थेट ताब्यात घेतले आहे.
चेहरे सारखे, सवयी सारख्या अन् आता गुणही ‘सेम टू सेम’! देवळ्यातील जुळ्या भावांची कमाल, SSC परीक्षेत घवघवीत यश त्यांच्यावर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आता या प्रकरणात आणखी कोणाकोणाची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास करत आहेत. अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा