Raigad Mhasla Nagar Panchayat Shivsena Congress Alliance : म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज गुरुवारी दुपारी 12 वाजता विशेष सभेत पार पडली.
म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन : रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगर पंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून, गेली 10 वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून शिंदे गटाच्या शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या म्हसळ्यात झालेल्या या सत्तांतरामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आखलेली राजकीय खेळी अखेर यशस्वी ठरली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शिंदेंच्या सेनेनं बहुमत सिद्ध केलं
म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज गुरुवारी विशेष सभेत निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं होतं. उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली आणि काही वेळातच निकाल जाहीर करण्यात आला. 17 पैकी 9 नगरसेवकांचं संख्याबळ एकत्र करत शिंदे गटाच्या शिवसेनेने बहुमत सिद्ध केलं. शिवसेनेकडून शाहिद जंजिरकर यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना पराभव स्वीकारावा लागला. Kalyan Dust Storm : तुफान आलंय! कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान, हवामानामुळे जनजीवन विस्कळीत
पुन्हा एकदा म्हसळ्यात सत्ता
म्हसळ्यातील हे सत्तांतर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा परिपाक मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची मागणी केली. जानेवारी 2026 मध्ये रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 7 नगरसेवकांना अपात्र ठरवत शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीनx गोगावले यांच्या राजकीय डावाला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही गोगावले यांनी काँग्रेससोबत नवं समीकरण जुळवत पुन्हा एकदा म्हसळ्यात सत्ता मिळवली.
सुनील तटकरेंचा फोटो हटवला
नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. खासदार सुनील तटकरे यांनीही बंडखोर नगरसेवकांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिंदे गटाने विजय मिळवत राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का दिला. दरम्यान, सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या दालनातील खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे फोटो लावण्यात आल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या घटनेला प्रतीकात्मक राजकीय संदेश मानले जात असून, म्हसळ्यात बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू आहे. Satara News: शरद पवारांच्या शिलेदाराची अजितदादांच्या खासदारासोबत बैठक; ‘तुतारी’ची साथ सोडणार? लवकरच पक्षप्रवेश
तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष तीव्र
निकाल जाहीर होताच शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके, घोषणाबाजी आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. म्हसळ्यातील हे सत्तांतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणासाठी महत्त्वाचं मानलं जात असून, तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा