महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड घडताना बघायला मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत चंद्रशेखर बावनकुळे सरकारचा काही निरोप घेऊन आले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भेटीवर काहीही न बोलता चंद्रशेखर बावनकुळे निघून गेले आहेत. पण दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाहून बाहेर पडतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी घडत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दबदबा आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार जिंकून आला नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा ठसा आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांना गर्दी होते. त्यांच्या भाषणांचा मोठा परिणाम राज्यातील तरुण वर्गामध्ये होताना दिसतो. तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. याशिवाय मनसे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मनसैनिक मराठी माणसासाठी वेळप्रसंगी अंगावर केसेही घ्यायला तयार असतो. मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आग्रही असतात आणि त्यांचे कार्यकर्ते देखील तितकेच आग्रही असतात. नुकतंच महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा चांगलाच गाजलेला बघायला मिळाला. यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे गेले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरे यांच्या भेटीला का गेले असावेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही दोन्ही नेत्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
बावनकुळे काहीही न बोलता निघून गेले
विशेष म्हणजे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे शिवतीर्थ बंगल्याबाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी बावनकुळे यांना राज ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण विचारले. पण चंद्रशेखर बावनकुळे काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून किंवा राज ठाकरे यांच्या पक्षाकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात मनसेने कठोर भूमिका घेतली होती. या विषयावरुन मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाल्याने अखेर सरकारने या परीक्षेला स्थगिती दिली आहे. या घडामोडी नुकत्याच घडल्या असल्याने या घडामोडींबाबत दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असावी का? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा