• Sun. Jul 5th, 2026

    जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2026
    जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम – महासंवाद

    मुंबई, दि.२४ – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे.  हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन हिवतापविरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने  दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपक्रमांमधून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याने किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवून सन २०३० पर्यंत टप्प्या-टप्प्याने हिवताप दुरीकरणाकडे राज्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

    राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी हिवताप दुरिकरण (२०१६- २०३०) हे उद्दिष्ट साध्य करणेकरिता हिवताप दुरिकरण मोहीम हा कार्यक्रम राबविला जात आहे.  वर्ष २०३० पर्यंत हिवताप दुरिकरण करणे हे ध्येय आहे. त्याअनुषंगाने राज्याने २१ डिसेंबर २०२१ रोजी हिवताप रोग अधिसूचित केला आहे.

    हिवताप समस्याग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गांवामध्ये किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांच्यामार्फत मोहीम राबविली जात आहे. राज्यात सन २०२५ मध्ये २३,२४७ हिवतापबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या वर्षी 21 एप्रिल २०२६ अखेर २,७२० हिवताप बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 236 रुग्ण हे imported (बाहेरून आलेले – स्थानिक नसलेले) आहेत.

    हिवताप प्रतिरोध महिना जून – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये हिवताप प्रतिरोध महिना विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवामध्ये जनतेमध्ये किटकजन्य आजारांविषयी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येते.

     सन २०२३ पासून राज्याची वर्षनिहाय हिवताप परिस्थिती

    वर्षहिवताप रुग्णपी.एफ. रुग्णहिवतापाने मृत्यूपी.एफ. %
    २०२३१६१५९६२९७१९३९
    २०२४२१०७९८८३१२६४२
    २०२५२२८३८८४८८२८३७
    (२१ एप्रिल २०२६ अखेर)२७२०६३४२३

     

    राज्यात सर्वाधिक हिवताप रुग्ण असलेले जिल्हे आणि मनपा पुढीलप्रमाणे-
    (जानेवारी २०२६ ते २१ एप्रिल २०२६ अखेर)

    जिल्हेमनपा
    जिल्हारुग्णमृत्यूमनपारुग्णमृत्यू
    गडचिरोली३४८बृहन्मुंबई१७७३
    रायगड७६ठाणे१३२
    सिंधुदुर्ग२५पनवेल१०४
    सातारा१८कल्याण२८
    रत्नागिरी१७मिरा भाईंदर२८
    चंद्रपूर१४वसई विरार२१


    हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतुपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती प्रामुख्याने आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून त्यामुळे मेंदूचा हिवताप होवून रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दुषित अनॉफेलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

    हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुष्परिणाम

    हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या  पेशीमध्ये त्यांची वाढ होते तेथे त्यांचे जीवन चक्र पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जेव्हा वरील रोगजंतू रक्त प्रवाहात मिसळून रक्तातील तांबड्या पेशींवर हल्ला करतात त्या रोगजंतूंना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खूप वाढते त्यामुळे त्याला खूप थंडी वाजून येते,  रुग्णास मळमळल्यासारखे वाटते, काही वेळेस उलट्या होतात, खूप डोके दुखते नंतर भरपूर घाम येऊन ताप उतरतो व गाडी झोप लागते.  पुन्हा 24 तासानंतर ताप येऊन वरील प्रमाणे त्रास होतो. खूप अशक्तपणा जाणवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. गर्भवती व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो विशेषता प्लाझमोडियम  फॅल्सिपेरम या जंतूमुळे होणारा हिवताप हा मेंदूज्वर होण्यास कारणीभूत ठरतो व तो अत्यंत जीवघेणा मानला जातो. वेळीच समूळ उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.

    उपाययोजना – हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करणे व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करून हिवतापाला आळा घालण्यासाठी प्रथमता दोन गोष्टी अंमल अमलात आणावयास हव्यात एक म्हणजे डासांवर नियंत्रण व हिवतापाने बाधित झालेल्या रुग्णास समूळ  उपचार देऊन रोगजंतूंचा समूळ नायनाट करणे .

    डास नियंत्रणासाठी उपाययोजना – किटकनाशक फवारणी – हिवताप पारेषण काळात राज्यातील ग्रामीण भागातील हिवतापासाठी अति संवेदनशील निवडक व उद्रेक ग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक पायथ्रॉइड गटातील किटकनाशकाची घरोघरी फवारणी.

    अळीनाशक फवारणी – राज्यात नागरी हिवताप योजनेअंतर्गत शहरातील  डासोत्पत्ती स्थानांवर प्रत्येक आठवड्याला अळी नाशकाची फवारणी

    जीवशास्त्रीय उपाययोजना -किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करून राज्यांमध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात येतात.  सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येतात. किटकनाशक भारित मच्छरदाण्या राज्यात हिवताप संवेदनशील निवडक गावांमध्ये मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येते.

    00000

    श्री.दत्तात्रय  कोकरे /वि.सं.अ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed