• Sun. Jul 5th, 2026

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2026
    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा – महासंवाद

    सांगली, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.

    जिल्ह्यातील विविध स्मारकांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी विजया यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज चे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिम चे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार आदि उपस्थित होते.

    यावेळी अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथील स्मारक, कुंडल येथील क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक, वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे स्मारक, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे कुंडल येथील स्मारक, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे सांगली येथील स्मारकाचे काम, येडेनिपाणी येथील स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील यांचे स्मारक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा येथील स्मृतिस्थळ विकास करणे, मौजे नागठाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारक, आटपाडी येथे गदिमा नाट्यगृह इमारतीचे बांधकाम करणे, वि. स. पागे स्मृतीस्थळ व रोहयो प्रशिक्षण केंद्र विसापूर, माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे मौजे कोकरूड येथील स्मारक, हिंदकेसरी मारुती माने यांचे कवठेपिरान येथील स्मारक, सांगली येथील दिवंगत आर आर पाटील यांचे स्मारक, आदी स्मारकांच्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed