• Wed. Jun 10th, 2026
    Pune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर

    पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे शहरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे. लोहगाव येथे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत असून कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडताना दोनदा विचार करत आहेत. सकाळी 10 नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होते.

    हवामान विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, या कालावधीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर अत्यावश्यक कारण असेल तर छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांच्या नोंदींमध्ये एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान 42 अंशांपेक्षा जास्त फक्त पाच वेळा गेले आहे. त्यामुळे यंदाची उष्णतेची लाट ही तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर मानली जात आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

    हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 18 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुण्यातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    दरम्यान, 18 ते 19 एप्रिलनंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

    सध्या पुणेकरांनी जास्तीत जास्त पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या वेळेत घरातच राहणे हेच सुरक्षित ठरेल. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

    दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या काळात नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच चार दिवसांनी म्हणजे 19 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिलला तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा