Missing Link Opening: मुंबई-पुणे मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवासात 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पण आखाती देशांमधील युद्धामुळे मार्गाचं डांबरीकरण रखडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प प्रवासासाठी गेमचेंजर ठरणार आहे. खोल दरीवर उभारलेल्या या जुळ्या पुलांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परंतु, आखाती देशांमधील युद्धाचा फटका या मार्गाला बसणार असल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डांबरीकरणासाठी लागणाऱ्या बिट्यूमेनच्या पुरवठ्याला फटका बसल्यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
कशामुळे विलंब?
हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना एमएसआरडीएच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. मिसिंग लिंकच्या मार्गावरील बोगद्यांचं काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. त्यामुळे त्यावरती डांबरीकरण आधीच झाले आहे. परंतु, केबल-स्टेड पुलांचं काम नुकतचं पूर्ण झालं आहे. या मार्गावर डांबरीकरण बाकी होतं. गेल्या पंधरवड्यात एमएसआरडीसी या कामासाठी बिट्यूमेन खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण बिट्यूमेनचे दर 50 टक्क्यांहून अधिक वाढल्यामुळे हे कठीण ठरत आहे. इराण, इराक, सौदी, ओमन आणि कुवैत सारख्या भागांमधून बिट्यूमेनचा पुरवठा होतो. सध्या सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे पुरवठ्याला फटका बसला आहे.Pune Metro: कोथरुडकरांसाठी गुड न्यूज! ‘मेट्रो लाईन 4आणि 4ए’चा आराखडा सादर; कोथरुड, वारजे, कर्वेनगरमध्ये उन्नत मार्गिका
याबरोबर, डांबरीकरणाच्या कामांसाठी लागणाऱ्या मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या हलक्या तेलाचा पुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे या मार्गाचं उद्घाटन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. कंत्राटदारांना 25 एप्रिलपर्यंत मिसिंग लिंकवरील कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सध्या यामार्गावर लोड टेस्टिंग सुरू असून 30 एप्रिलपर्यंत ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर 1 मे रोजी उद्घाटन करून मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे निर्देश आहेत. काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अजूनही मार्ग 1 तारखेपर्यंत खुला होऊ शकतो. सध्या कामं थांबू नयेत यासाठी कंत्राटदार जास्त किंमतीत आवश्यक साहित्य खरेदी करण्याचे प्रयत्न करत आहेत.
Pune News : पुणेकरांना दिलासा! कात्रज-कोंढवा ट्रॅफिक जाम कमी होणार; भू-संपादनाला कोट्यवधी मिळाले, रस्ता रुंदीकरणाला वेग, 32 टक्के काम पूर्ण
कसा आहे मार्ग?
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गावरती 1.64 मीटरचे दोन जुळे बोगदे तयार करण्यात आले आहेत. तसेच, टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांब केबल-स्टेबड पूल उभारले गेले आहेत. हा संपूर्ण मार्ग 13.3 मीटर लांब असून मुंबई-पुणे मार्गावरील खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करणार आहे. या मार्गावर 9 किमी लांब बोगदा आहे जो थेट कुसगावला जोडतो. या बोगद्यामुळे लोणावळा-खंडाळा घाटाला बायपास करून थेट पुण्यापर्यंत प्रवास करणं शक्य होतं. त्यामुळे घाटात तासांतास होणाऱ्या रखडपट्टीपासून नागरिकांची सुटका होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा