• Sat. Jun 6th, 2026
    IAS Tukaram Mundhe : ‘नवीन युगातील तुकाराम मला माहीत नाही’, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याची चर्चा

    आयएएस तुकाराम मुंढे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला केवळ संत तुकाराम माहिती असल्याचं म्हटलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या त्यांच्या बदलीवरून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांची आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या सचिव पदी बदली करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची मागील 21 वर्षाच्या कारकीर्दीत 25 वेळा बदली झाली आहे. राज्यभरात त्यांच्या कामाचे कौतुक होत असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र अजब विधान केलं आहे. मला तुकाराम महाराजांबद्दल माहित आहे. नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही, असं वक्तव्य विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. त्यांच्या या अजब प्रतिक्रियेची चर्चा रंगू लागली आहे.

    नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर आहे. जवळपास 28 आमदारांची अंदाज समिती असून त्यात सदाभाऊ खोत यांचा देखील समावेश आहे. समितीकडून जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर खोत यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालया भेट दिली. तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली का केली जाते? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी अजब उत्तर दिले. “माझं घराने वारकरी संप्रदायाच असल्यामुळे संत तुकाराम महाराजांबाबत मला माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते, पण नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही”, अस म्हणत ते निघून गेले. एका चांगल्या अधिकाऱ्याच्या कार्याचे कौतुक न करता उलट खोत यांनी माहिती नसल्याचं उत्तर दिल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

    तुकाराम मुंढेच्या बदलीसाठी दिव्यांगाचे आंदोलन

    आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेकडून आज आंदोलन करण्यात आले. दिव्यांग संघटनेचे नेते राहुल साळवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संघटनेकडून मंत्रालयात देखील आंदोलन करण्यात आले होते. तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगासाठी चांगले काम केले आहेत. त्यांची बदली रद्द करण्यात यावी अन्यथा विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना घेराव घालणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

    आमदार खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

    दरम्यान, विधिमंडळ अंदाज समिती नांदेड दौऱ्यावर आहे. समितीचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांनी आढावा घेतल्यानंतर नांदेडच्या परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणी दौऱ्यात विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. विभाग नियंत्रकांना वेळ सांगूनही उपस्थित न राहिल्याने सदाभाऊ संतापले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार टाकला. एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी विभाग नियंत्रकांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही खोत यांनी केला. परिवहन मंत्र्यानी विभाग नियंत्रकावर कारवाई करण्याची मागणी खोत यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा