• Sat. Jul 4th, 2026

    मोर्बा नळ पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविणार –  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 7, 2026
    मोर्बा नळ पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविणार –  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि.७ : मोर्बा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बिल व त्यातील व्याजाची रक्कम याचा ताळमेळ घालून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

    रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोर्बा नळ पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलातील व्याजाची रक्कम माफ करण्याबाबत निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य अभियंता प्रशांत भामरे, पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, मोर्बा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ऊर्जा विभाग नक्कीच याबाबत कार्यवाही करेल. नियमांच्या अधीन राहून यामध्ये निर्णय घेण्यात येईल व मोर्बा ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

    महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मोर्बा ग्रामपंचायतीची थकीत मुद्दल रक्कम ग्रामपंचायतीने फेब्रुवारी २०२२ मध्येच भरली होती त्यानंतरही शासनाच्या वन टाईम सेटलमेट योजनेअंतर्गत व्याजाची रक्कम माफ व्हावी, अशी ग्रामपंचायतीची मागणी होती. मात्र, अद्यापही बिलामध्ये  व्याजाची रक्कम थकीत दाखवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीला दिलासा देण्यात यावा. ग्रामपंचायतीने यापूर्वीच मुद्दल रक्कम भरलेली असल्याने, आता व्याजातून सूट मिळवून आणि उर्वरित तांत्रिक बाबींची पूर्तता करून पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed