Pune Crime News : पुण्याच्या मंचरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आईने आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला आणि नंतर मुलासह विहिरीत उडी घेतली. या दुर्घटनेत ६ वर्षांच्या चिमुरड्याचा अंत झाला असून आई आणि मुलगी मृत्यूशी झुंज देत आहेत.
कौटुंबिक वाद, आईने मुलांसह विहिरीत उडी घेतली, सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात कौटुंबिक वादातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करून मुलासह विहिरीत उडी घेतल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर परिज्ञा आशिष बाणखेले (वय १४) ही मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आई हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) हिचीही प्रकृती चिंताजनक असून तिलाही मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मोठा आवाज आल्याने स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. काही नागरिकांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून महिला व मुलाला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर नेहाल याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. पती आशिष बाणखेले यांनी मुलगी परिज्ञाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला महिलेने टाळाटाळ केली. मात्र, नंतर तिने घराची किल्ली देत मुलगी आत असल्याचे सांगितले. घराचा दरवाजा उघडल्यावर परिज्ञा गंभीर अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर खुणा दिसून आल्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंविक वाढमुळे स्वतःचा आणि स्वतःच्या मुलांचा जीव जीव महिलेने धोक्यात घातला आहे. यामागे नेमके हे टोकाचे पाऊल का उचलावे लागले? याचा तपास पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा