Ashok Kharat Case: चौकशीच्या फेऱ्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन्ही पदं गेली, आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक धक्का; चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिला अत्याचार प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर रुपाली चाकरणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपदही गमवावं लागलं. अशोक खरातसोबत असलेल्या जवळीकीमुळे राजकीय नामुष्की ओढावलेली असतानाच आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच खरात आणि त्याच्या शिवनिका संस्थानशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक होत चालला असून या संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या चौकशीच्या फेऱ्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवनिका संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेले सर्व आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद गुंतवणुकीची कागदपत्रे देखील विशेष पोलीस तपास पथकाच्या रडारवर आहेत. या संस्थांमध्ये आजवर कोण कोण सदस्य होते, कोणाच्या काळात कोणते निर्णय घेण्यात आले? याची देखील सखोल माहिती तपास पथकाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलावले केले जाणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे या संस्थानच्या मंडळात सदस्य राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती आहे.
मुख्य संशयित अशोक खरात याची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर करण्यात आलं. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने खरातला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अशोक खरात याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचत असल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यात या तपासाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून या प्रकरणाच्या तपासात आगामी काळात नेमके काय धागेदोरे उलगडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा