• Sat. Sep 19th, 2026

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 5, 2026
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक – महासंवाद

मुंबई, दि. ५ : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारसंदर्भात विधानभवन येथील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस आमदार विलास तरे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, पालघर एस. टी. विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने सामान्य प्रवासी केंद्रस्थानी ठेवून आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. बसस्थानक व बस डेपो विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये मनुष्यबळ व बसगाड्यांची कमतरता दूर करून प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा. पालघर जिल्ह्यांसाठी दोन वर्षात २०० नव्या बसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील एसटी सेवेची सद्यस्थिती, रिक्त पदे तसेच बस उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात यावेळी आला. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी परीक्षा प्रक्रिया प्राधान्याने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देशही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

पालघर जिल्ह्यात आठ एसटी आगार, एक विभागीय कार्यशाळा आणि एक विभागीय कार्यालय असून पालघर एसटी विभागात पर्यवेक्षीय पदांच्या पदोन्नती  संदर्भात परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

०००

एकनाथ पोवार/वि.सं.अ.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed