• Mon. Mar 16th, 2026

    हिंद दी चादर समागम सोहळा – जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातर्फे माता, बालकांची तपासणी मोहीम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2026
    हिंद दी चादर समागम सोहळा – जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातर्फे माता, बालकांची तपासणी मोहीम – महासंवाद

    नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सोमवार १६ फेब्रुवारी, २०२६ पासून जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात माता आणि बालकांसह असंसर्ग आजारांच्या तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी (बाह्य संपर्क) यांनी दिली आहे.

    हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

     या आरोग्य तपासणी शिबिराचे वेळापत्रक असे : अनुक्रमे रुग्णालयाचे नाव, दिनांक या क्रमाने : ग्रामीण रुग्णालय, दोडी, १६ फेब्रुवारी २०२६. ग्रामीण रुग्णालय, झोडगे, लासलगाव, १७ फेब्रुवारी २०२६. सामान्य रुग्णालय, मालेगाव, १८ फेब्रुवारी २०२६. ग्रामीण रुग्णालय, सटाणा, दाभाडी, महिला सामान्य रुग्णालय, मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय, निफाड, २० फेब्रुवारी २०२६. ग्रामीण रुग्णालय, डांग सौंदाणे, नामपूर, चांदवड, देवळा, इगतपुरी, अभोणा, नांदगाव, मनमाड, गिरणारे, सुरगाणा, २३ फेब्रुवारी २०२६. ग्रामीण रुग्णालय, उमराणे, दिंडोरी, बाऱ्हे, हरसूल, उपजिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर, येवला, जिल्हा रुग्णालय, नाशिक, उपजिल्हा रुग्णालय, कळवण, ग्रामीण रुग्णालय, नगरसूल, २५ फेब्रुवारी २०२६.

    तरी या आरोग्य तपासणी शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंपी यांनी केले आहे.

    ००००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed