ल्याण-डोंबिवलीत गेल्या महिन्याभरापासून ‘नॉट रिचेबल’ असलेले ठाकरे गटाचे ३ नगरसेवक अचानक कोकण भवनात हजर झाले. मशाल चिन्हावर निवडून येऊनही गायब असलेल्या या नगरसेवकांमुळे राजकीय सस्पेन्स वाढला असून…
मनसेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकले..
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मतमोजणी झाल्यापासून त्यापैकी राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे हे तीन नगरसेवक बेपत्ता होते.नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे हे मूळचे मनसेचे कार्यकर्ते असून त्यांनी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे सुरुवातीला फक्त 7 नगरसेवक एकत्र आले होते, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचा गट स्थापन होण्यात अडचणी येत होती. महासभेत व्हीप बजावण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने पक्षाची कोंडी झाली होती. दरम्यानच्या काळात किर्ती ढोणे या नगरसेविका पक्षाच्या संपर्कात आल्या आणि त्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत सहभागी झाल्या.
Jalgaon News: सॅटेलाइट पाहणीत जळगावात 44 हजार हेक्टरवरील बनावट केळी पीक विमा उघड; 37 कोटी जप्त, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या 8 वर पोहोचली आणि ठाकरे गटाचा गट स्थापन झाला. मात्र, उर्वरित तीन नगरसेवक गायब होते मात्र आज शुक्रवारी त्यानी आपली नगरसेवक नोंदणी केली आहे.त्यामुळे ते नक्की कोणतं जाणार हा प्रश्न कायमं आहे. दरम्यान आता यावर ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते हें पहावे लागेल.
मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्षाच्या प्रक्रियेपासून लांब राहिलेल्या या तीन नगरसेवकांना ठाकरे गटाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात ठाकरे गटाची ताकद वाढणार की पेच कायम राहणार, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
