• Thu. Jun 18th, 2026

    ऊसतोड कामगाराच्या मुलाची शासकीय सेवेत दिमाखात एन्ट्री,

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2026
    ऊसतोड कामगाराच्या मुलाची शासकीय सेवेत दिमाखात एन्ट्री,
     नाशिक
     कुटुंबाला घेऊन ऊसतोडीसाठी जाणाऱ्या साईनाथ पोकळे या नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील लोढरे गावातील ऊसतोड कामगाराच्या मुलाने महाराष्ट्र सुरक्षा दलात गुणवतेच्या जोरावर दिमाखात एन्ट्री केली आहे. पिंटू पोकळे असे त्याचे नाव आहे. ठाकरवाडीतील या सामान्य आदीवासी कुटुंबातील तरुणाचे हे लखलखते यश तालुक्यासह जिल्ह्याला झळाळी देणारे ठरले आहे.

    घरची परिस्थिती बेताची

    हातावर पोट आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी असल्याने पिंटूचे वडील साईनाथ पोकळे ऊसतोडीसाठी महाराष्ट्रात सर्वदूर कुटुंबासोबत जात असत. त्यांचा मुलगा पिंटू ठाकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकला. त्याची हुशारी, जिद्द बघून शिक्षकांनी त्याला मार्गदर्शन केल्याचे त्याचे शिक्षक नारायण चव्हाण सांगतात. वन खात्यात असलेल्या प्रवीण चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्या पंखात बळ भरले. जिद्द, प्रयत्न व निष्ठेच्या जोरावर पिंटूने मुंबई ‘एमएसएफ’मध्ये मानाची जागा पटकावली. या यशाबद्दल जि.प. शाळा लोढरे ठाकरवाडी आणि गावाच्या वतीने पिंटूचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. अहिरे, विकास पोकळे, मुन्ना पोकळे सागर पोकळे, संतोष पोकळे, उमेश चव्हाण, महेश राठोड आदी उपस्थित होते. याच गावातील मैना राठोड या तरुणीची गेल्यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. राठोड पाठोपाठ आता पिंटू याचे यश गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

    ‘एमएसएफ’चे स्वरुप काय?

    सन 2010 मध्ये या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाची सरकारी कार्यालये, विमानतळ आदींच्या सुरक्षेसाठी या यंत्रणेकडे जबाबदारी असते. मुंबई पोलीस कायदा 1951 अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून या दलातील अधिकाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे.

    पोलीस ठाण्यात खडसे आणि पोलीस अधिकाऱ्यात वाद?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर करुन अवमान केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांनी एका बड्या मंत्र्यांबाबतही पोलीस ठाण्यात अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप देखील असल्याची मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सावदा पोलीस ठाण्यामध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याचा आरोप आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed