• Wed. Jul 1st, 2026

    एपस्टीन फाइल्समध्ये नाव, फोटो आल्याने जगात एकच खळबळ

    ByMH LIVE NEWS

    Feb 9, 2026
    एपस्टीन फाइल्समध्ये नाव, फोटो आल्याने जगात एकच खळबळ

    अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी संबंधित कागदपत्र सतत समोर येत आहेत. या खुलाशांनंतर जगातील अनेक देशांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या कागदपत्रांमध्ये ई मेल, सोशल संपर्क, पैशांचे व्यवहार आणि खासगी भेटीगाठींसंदर्भात माहिती समोर आली आहे. अनेक मोठ्या पदांवर बसलेल्या लोकांसदर्भात प्रश्न निर्माण झालेत. काहींनी दबावाखाली येऊन राजीनामा दिलाय. अलीकडेच ब्रिटन आणि नॉर्वेमध्ये काहींनी राजीनामे दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी पीटर मँडेलसन यांना अमेरिकेत ब्रिटनचा राजदूत बनवण्याचा सल्ला दिलेला हे एपस्टीन फाईल्समधून समोर आलं. म्हणून मॅकस्वीनी यांच्यावरील दबाव वाढला. हा सल्ला चुकीचा होता हे मॅकस्वीनी यांनी मान्य करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला.

    नॉर्वेमध्ये सुद्धा एपस्टीन फाईल्सचा प्रभाव दिसून आलाय. तिथल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोना जूल आपलं पद सोडणार आहेत. 66 वर्षीय जूल आधी मंत्री होत्या. इस्रायल, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रात त्यांनी नॉर्वेच्या राजदूत म्हणून जबाबदारी संभाळली आहे. अमेरिकेत सुद्धा परिणाम दिसतोय. फेब्रुवारी 2026 मध्ये ब्रॅड कार्पने एका मोठ्या लॉ फर्मच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. कारण त्यांनी एपस्टीनशी ईमेल संपर्क केल्याचं समोर आलेलं.

    फाईल्सशी संबंधित वादांनी दबाव वाढवला

    त्याआधी नोव्हेंबर 2025 मध्ये लॅरी समर्स यांनी एक महत्वाचं बोर्डाचं पद सोडलं. एपस्टीशी संर्पक ठेवणं चूक होती हे त्यांनी मान्य केलं. डिसेंबर 2025 मध्ये एफबीआयचे उप संचालक डॅन बोंजिनो यांनी सुद्धा वादामुळे पद सोडलं. त्यांच्या प्रकरणात थेट संबंध समोर आला नाही. पण फाईल्सशी संबंधित वादांनी दबाव वाढवला.

    सांस्कृतिक संस्थेच्या प्रमुख पदाचा राजीनामा

    एपस्टीन फाइल्समुळेच फ्रान्सचे माजी मंत्री जॅक लॅग यांनी एका सांस्कृतिक संस्थेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. स्लोवाकियामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाजचाक यांनी ईमेल वादानंतर पद सोडलं. स्वीडनमध्ये सुद्धा एका अधिकाऱ्याने पद सोडलं. गु्न्हा सिद्ध झाल्यामुळे हे राजीनामे होत नाहीयत. तर फक्त नाव, संपर्क आणि फोटोत झळकल्याने हे राजीनामा सत्र सुरु आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed