• Tue. Jun 30th, 2026

     अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
     अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश

    अमेरिका आणि इराणमधील संबंध आता प्रचंड ताणले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, अमेरिकन दूतावासाकडून इराणमध्ये असलेल्या आपल्या सर्व नागरिकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये इराण सोडावं, असा थेट आदेशच अमेरिकेन आता आपल्या इराणमधील नागरिकांना दिला आहे, त्यामुळे अमेरिका आता कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच इराणकडून देखील अमेरिकेला इशारा देण्यात आला होता, की आमच्या क्षेत्रात कुठेही हल्ला झाला तर आम्ही त्याला आमच्याविरोधातील युद्धाला सुरुवात समजू आणि आम्ही देखील मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्व सैन्य तळांवर हल्ले करू, त्यामुळे आता जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर जगात आणखी एका मोठ्या युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणचं सैन्यदल देखील अलर्ट मोडवर असून, अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक महत्त्वाचे रस्ते देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.

    युद्धाला सुरुवात होऊ शकते, असं वाटत असल्यानेच आता अमेरिकेनं इराणमधील आपल्या सर्व नागरिकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. तुम्हाला जसं शक्य आहे, तसं हवाई मार्गाने, जलमार्गाने कोणत्याही मार्गाने इराणच्या बाहेर पडा, असं या अ‍ॅडवायझरीमध्ये अमेरिकेनं म्हटलं आहे.तर दुसरीकडे जगातील अनेक देशांनी देखील इराणमध्ये जाणारी विमान उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅडवायझरीमध्ये अमेरिकेनं असं देखील म्हटलं आहे की, इराणमध्ये जे अमेरिकेचे नागरिक आहेत, त्यांनी सरकारच्या मदतीची अपेक्षा न ठेवता, इराणमधून बाहेर पडावं

    भारतालाही बसणार मोठा फटका

    दरम्यान अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झालं तर त्याचा फटका हा भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसू शकतो. कारण भारत अजूनही ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण होईल, त्याचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार असून, भारतामध्ये ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं, भारत इराणकडून देखील कच्च्या तेलाची आयात करतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed