उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं. तसेच त्यांनी वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टलादेखील भेट दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतिसंगमावरून थेट वेणूताई चव्हाण स्मारकात आल्या. स्मारकातील ग्रंथालय आणि संग्रहालयाची पाहणी करून बाहेर पडत असताना माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना यशवंतरावांचे इच्छापत्र दाखवले. हे स्मारक उभारण्यासाठी यशवंतरावांनी जमीन विकली आणि वेणूताईंचे दागिने मोडले होते, अशी माहिती दिली. यशवंतराव आणि वेणूताई यांना आदर्श दाम्पत्य का म्हणतात? याची प्रचिती सुनेत्रा पवार यांना त्यावेळी आली.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात पत्नी वेणूताईंची अनमोल साथ लाभली होती. त्याबद्दच्या आठवणी पत्राच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सार्वजनिक न्यास (Public Trust) स्थापन करून वेणूताईंचे स्मारक उभारण्याचा संकल्प केला होता.
Sunetra Pawar : सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी महत्त्वाची जबाबदारी
यशवंतरावांनी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या इच्छापत्रात म्हटले होते की, पत्नीची आठवण चिरंतन राहावी, हा उरलेला माझ्या जीवनातील एकच आनंद आहे. त्यादृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माझ्या कराड गावी एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी. त्या वास्तूत माझ्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मला प्रेमाने भेट दिलेल्या वस्तुंचेही संग्रहालयाच्या माध्यमातून जतन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. ग्रंथालय आणि संग्रहालय हे माझ्या पत्नीची स्मृती म्हणून त्याच्या दैनंदिन जपणुकीची योजना करावी, असा संकल्प असल्याचेही त्यांनी इच्छापत्रात नमूद केले होते.
BMC Mayor Election : अखेर सस्पेन्स संपला? मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट
वेणूताईंचे दागिने मोडून, तसेच पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन गावातील शेतजमीन विकून मिळालेल्या पैशातून कराडमध्ये स्मारकासाठी शंभर वर्षांच्या लीजवर जागा घेतली. त्या जागेवर स्मारकाचे काम सुरू केले होते. मात्र, काही काळातच यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या सूचनेनुसार माजी आमदार दिवंगत पी. डी. पाटील यांनी वेणूताईंच्या स्मारकाचे काम पूर्ण करून घेत यशवंतरावांची इच्छापूर्ती केली होती.
