Amri Bharat Express Features: मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान आता अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर आणि आरडीएसओच्या सूचनेनुसार आजपासून या गाडीची चाचणी सुरू होत आहे.
‘अमृत भारत’ची वैशिष्ट्ये
ही अमृत भारत रेल्वे नवी संपूर्ण विनावातानुकूलित एक्स्प्रेस असणार आहे, त्यामुळे सर्वसाधारण प्रवाशांच्या खिशाला झळ नाही बसणार. तसचे उच्च सुरक्षा आणि कमाल वेगाची क्षमतेचे एलएचबी डबे या एक्सप्रेसमध्ये आहेत. शिवाय पूश-पूल म्हणजे गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिनजोडणीसुद्धा आहे. कमी वेळेत अधिक गतीवर पोहोचण्याची क्षमता या अमृत भारत एक्सप्रेसमध्ये आहे. इंजिन बदलण्याचा वेळ वाचणार असल्यामुळे ही एक्सप्रेस विलंबाने धावणार नाही आणि प्रवाशांना वेळेत इच्छुक स्थळी पोहचता येईल.
Amrit Bharat Express: स्वस्तात लांब पल्ल्याचा प्रवास शक्य! मुंबईकरांसाठी आणखी एक ‘अमृत भारत एक्सप्रेस’; कल्याण, पनवेलसह कुठे असतील थांबे?
अशी आहे गाडी…
वेग : ताशी १३० किमी
डबे : २२ (एलएचबी)
इंजिन : २
ताशी १३० किमी का ?
देशातील बहुतांश एलएचबी गाड्यांसाठी ताशी १३० किमी हा मानक कमाल वेग आहे. यासाठी नव्या एक्स्प्रेससह रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, पूल यांची तपासणी केली जाते. कमाल वेगाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतुकीच्या नियमित सेवेचा मार्ग खुला होतो. चाचणीदरम्यान सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या वेगमर्यादांचे पालन केले जाणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Thane-CSMT: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सुलभ! शीव उड्डाणपुलाला समांतर 150 कोटींचा आणखी एक पूल; कसा असेल मार्ग?
अशी होईल चाचणी
२३ जानेवारीला सकाळी ९ वाजता अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल
२४ जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद
चाचणीत काय तपासणार ?
रुळांवर पूर्ण वेगाने धावताना जाणवणारे कंपन
कमाल वेगात डबे आणि इंजिन यांची स्थिरता
ब्रेकिंग यंत्रणेची कार्यक्षमता
सस्पेन्शन व कपलिंगची कामगिरी
प्रवासी सुरक्षितता
Amit Satam : मुंबईची महापौर कधी ठरणार? अमित साटमांनी निवड प्रक्रिया सांगितली
प्रवाशांना फायदा
विनावातानुकूलित असल्याने तिकीट दर परवडणारे
प्रवासाचा वेळ वाचणार
सामान्य दरात आधुनिक सुविधा
