मुंबई महापालिकेत आता तीन दशकांनी सत्तापालट होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर शिवसेना आणि भाजपला यश आलं आहे. पण तरीही दोन्ही पक्षांना वैयक्तिकरित्या बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महापौर पदावर भाष्य केलं.
“मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. विधानसभेला किंवा लोकसभेला पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. आमची शिवतीर्थावर सभा झाली. आपण सगळे जण साक्षीदार आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची सभा शिवतीर्थावर झाली. आमच्या सभेला गर्दी होती पण मतदान होत नाही. पण त्यांच्याकडे रिकाम्या खुर्च्या मतदान करु शकतात? हे न उलगलेलं कोडे आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“त्यांनी गेल्या चार दिवसांत जो पैशांचा वाटप केला तो चार दिवसांचा नव्हता तर ते गेले चार वर्ष हे पैसा परेत होते. आमचे जे निवडून आलेले नगरसेवक होते त्यापैकी त्यांनी जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांच्या गळाला लावले होते. चार वर्षे त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना नरसेवक नसताना विकासनिधीच्या नावाने अमाप पैसा वाटला. निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कूकर, मिक्सर, साड्या वाटल्या. हा पैसा येतो कुठून?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
Uddhav Thackeray : ‘शिवसैनिक आणि मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो’, उद्धव ठाकरेंची निकालावर पहिली प्रतिक्रिया
“या पैशांच्या सोर्सच्या मागे इनकम टॅक्स, सीबीआय लागत कशी नाही? एवढं सगळं होऊनही अमाप पैसा वाटला जातो. मग 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा यासाठी मोदींनी जी नोटबंदी केली होती ती अयशस्वी झाली का? याचं उत्तर कोणीतरी शोधलं पाहिजे”, असं ठाकरे म्हणाले.
“भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरच्या शिवसेनेला ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांनी दाखवून दिलं आहे. भाजप हा पक्ष कागदावर आहे, पण जमिनीवर नाही. कारण हा पक्ष जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. त्यांना यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Uddhav Thackeray : ‘निवडणूक आयुक्त ब्रह्मदेवाचा बाप नाही’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
“आज देखील साधे-साधे शिवसैनिक निवडून आले आहेत. प्रचंड साध्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठ मानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे आज दाखवलेलं आहे. सर्व मुंबईकरांना धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडे खास अपेक्षा नक्कीच होती”, अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
