EVM Machines: पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएमची मागणी वाढली आहे. मतदार वाढल्याने अधिक यंत्रांची गरज भासणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राखीव ईव्हीएमची व्यवस्था केली जात आहे.
पुण्यात २०१७नंतर आता पुन्हा महापालिका निवडणूक होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंख्येत साडेनऊ लाखांहून अधिकची भर पडली आहे. मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्र पालिकेकडे उपलब्ध आहेत. मात्र, अचानक येणाऱ्या अडचणी, यंत्र बंद पडणे यामुळे दहा टक्के यंत्र राखीव ठेवावी लागतात. त्यासाठी लागणाऱ्या यंत्रांची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे.
Pune News : ‘महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका अजित पवार’, भाजप आमदार महेश लांडगे यांचा घणाघात
‘एका मतदान केंद्रावर ८०० ते ९०० मतदारांनाच मतदान करता येते. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे दहा लाख मतदार वाढले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने ‘ईव्हीएम’ही वाढवावे लागले आहेत. मात्र, मतदानासाठी आवश्यक ११ हजार ८०० यंत्र पूर्वीच उपलब्ध झाली आहेत,’ असे महापालिकेचे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दहा टक्के ‘ईव्हीएम’ राखीव ठेवावी लागतात. त्यासाठीची यंत्रे आणण्याची कार्यवाही सुरू आहे. बुलढाणा येथून ३४०० यंत्रे आणण्यात आली, तर उर्वरित लातूरमध्ये उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ध्या रात्री घडामोडी, बापूंविरोधात मुलगा-सूनेची लढाई; ऐश्वर्या-सुरेंद्र पठारे जोडीने खिंड लढवणार
‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार’
येरवडा परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नागरिकांना थेट तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून कारवाई न झाल्यास नागरिकांनी स्वतः मंत्र्यांशी संपर्क साधल्यास गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. येरवडा प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. गाडीतळ परिसरात झालेल्या या जाहीर सभेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नागरिकांना धीर दिला.
