• Wed. Mar 18th, 2026

    Solapur News : काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराचा थेट MIM मध्ये प्रवेश, प्रणिती शिंदेंना मोठा धक्का

    Solapur News : काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराचा थेट MIM मध्ये प्रवेश, प्रणिती शिंदेंना मोठा धक्का

    सोलापुरात खासदाप प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या जवळच्या महिला नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे पक्षाने त्यांना सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर केली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे.सोलापुरात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या 20 उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसच्या महिला नेत्या फिरदोस पटेल यांचं काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव होतं. प्रभाग 16 मधून काँग्रेस फिरदोस पटेल, सीमा यलगुलवार, नर्सिंग कोळी अशा तीन उमेदवारांची नावे होती. फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदेंच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जातात. पण त्यांनी रविवारी 28 डिसेंबर रोजी एमआयएमच्या वरीष्ठ नेत्यांना भेटून प्रभाग 16 मधून उमेदवारी मागितली.

    प्रभाग 16 हा मुस्लिम बहुसंख्याक असलेला प्रभाग असल्याने फिरदोस पटेल यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झाले आहे. फिरदोस पटेल या महिला नेत्याने प्रतिक्रिया देताना, नाराजी व्यक्त केली. सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. त्यामुळे काँग्रेस सोडून जाण्याचा आणि एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा ठरवलं, अशी प्रतिक्रिया फिरदोस पटेल यांनी दिली आहे.
    Maharashtra TimesPune News : पुण्यातील राजकारण नाट्यमय वळणावर, महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांची दांडी

    फिरदोस पटेल प्रणिती शिंदेंच्या विश्वासू, तरीही…

    फिरदोस पटेल या काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुकीत होत्या, त्यावेळी फिरदोस पटेल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रणिती शिंदेंसाठी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील फिरदोस पटेल यांनी खासदार प्रणिती शिंदेंसाठी अहोरात्र मेहनत घेतली.
    Maharashtra TimesMira Bhayandar Election: युतीची ‘डेडलाईन’ ठरली! प्रताप सरनाईकांचा भाजपला २४ तासांचा अल्टिमेटम; मैत्री टिकणार की तुटणार?
    विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलत गेले. फिरदोस पटेल यांचे जवळचे नातेवाईक शौकत पठाण यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. तेव्हा पासून फिरदोस पटेल यांच्यावर काँग्रेस पक्षात संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंच्या खास आणि विश्वासू फिरदोस पटेल यांनी दिली आहे. दरम्यान, फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता प्रभाग 16 मध्ये काँग्रेसचा विजय होतो की एमआयएमचा विजय होतो? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा