अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याने आज तब्बल पाच जणांवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर शाळा तात्पुरता बंद करण्यात आल्या. तसेच सरपंच हर्षदा मयेकर यांनी यावेळी नागरिकांना मोलाचं आवाहन केलं.
परिस्थिती गंभीर होताच नागावमधील सर्व शाळा तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी पालकांना आश्वस्त केलं आहे. “घाबरून जाऊ नका. मुलं शाळेत पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रशासन सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे”, असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर सोडण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. हर्षदा मयेकर यांनी गावकऱ्यांना उघड्यावर फिरणे टाळण्याचे, प्राणी दिसल्यास त्वरित कळवण्याचे आणि सतर्क राहण्याचे विशेष आवाहन केले आहे.
बिबट्याचा शिरकाव आणि हालचालींची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अलिबाग फॉरेस्टचे अधिकारी भोईर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिबट्याच्या हालचालींची माहिती पडताळून पाहिली असून, रेस्क्यू टीम सतत गस्त घालत आहे. प्राण्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर प्रहार, श्रीकांत शिंदे यांचं लोकसभेत मतचोरीवर आक्रमक भाषण
गावकऱ्यांना शक्यतो घरातच राहण्याचा आणि संध्याकाळीनंतर बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, ग्रामपंचायत आणि वनविभाग एकत्रितपणे काम करत आहेत. स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
‘मुंबईत घरातून निघाले नाहीत आणि आज इथे…’, श्रीकांत शिंदेंचा लोकसभेत ठाकरेंवर घणाघात
हा संपूर्ण प्रसंग नागावमध्ये वन्यप्राण्यांच्या अचानक शिरकावाच्या धोक्याची जाणीव करून देणारा असून, भविष्यातील बचावात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्याची आवश्यकता स्पष्ट करतो. नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांनी मोठी चिंता निर्माण झाली असली तरी वनविभाग आणि प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
