Chandrapur Tiger Death: प्रसिद्ध ‘जय’ या वाघाचा हा बछडा असलेल्या टी-४० वाघाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सिंदेवाही परिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह चंद्रपूरमधील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यापूर्वी चौकशी करण्यात आली. डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या नेतृत्वाखालील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने शवविच्छेदन केले. वाघाचा मृत्यू रेल्वेची धडक बसल्यानंतर जखमा आणि अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाल्याची पुष्टी केली.
लग्नानंतर दुसरीच्या प्रेमात; गर्लफ्रेंडकडून ब्लॅकमेल, मोदींना शेवटचं पत्र लिहित तरुणाने आयुष्य संपवलं
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगत आहे. वाघांचा भ्रमण मार्गसुद्धा आहे. नव्याने घोषित झालेला कन्हाळगाव अभयारण्य, कावल अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो. एवढा महत्वाचा भ्रमण मार्ग असताना रेल्वे प्रशासन व वनविभाग अजूनही आवश्यक योजना राबविण्यात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Chandrashekhar Bawankule: नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्यांना तिकीट नाही, तर…; उमेदवारीवरुन बावनकुळेंचा इशारा, काय म्हणाले?
उपाय शोधण्याचे हायकोर्टाचे निर्देश
बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातून वेगात धावणाऱ्या रेल्वेमुळे अपघात होऊन दरवर्षी वाघांसह इतर अनेक वन्यप्राणी मृत्युमूखी पडत आहेत. याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने गती कमी करणे हा व्यावहारिक उपाय नसून इतर उपाय शोधण्याचे निर्देश रेल्वे विभागासह याचिकाकर्त्याला अलीकडेच दिले आहेत. दाट जंगलातून बाहेर पडणाऱ्या वाघ, बिबट अन्य वन्यप्राणी यांच्यासाठी कॉरिडॉर सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत वन्यप्रेमींनी व्यक्त केले.
११ वन्यजीवांचा मृत्यू
चालू वर्षात रेल्वे अपघातात दोन वाघ, एक बिबट, तीन अस्वल, चार सांबर आणि एक रानगवा अशा एकूण ११ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

