Nandurbar Medical Officer Dies : नंदुरबारमधील तोरणमाळ येथे बरेच पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. असेच एक वैद्यकीय अधिकारी आलेले असताना त्यांचा पाय घसरुन त्यांचा तोल गेला, अन् ते खोल दरीत खाली पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा तालुक्यातील सावळा येथील डॉ.सुभाष रविंद्र जगताप (वय 28) हे धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दि. 23 सप्टेंबर रोजी 5 वाजेच्या सुमारास तोरणमाळ परिसरातील आमदरी पॉईंट येथे ते फिरायला गेले असता त्यांचा पाय घसरुन तोल गेल्यानं ते खोल दरीत पडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सदरची घटना कळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांत कळविले. त्यानंतर म्हसावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Nanded News : पुराचं पाणी घरात शिरलं, घरातील साहित्य नेताना पाय घसरला; 16 वर्षीय मुलासोबत अनर्थ; अख्खं नांदेड हळहळलं
याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, हवालदार राणसिंग सनेर व त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलिसांनी राणीपुर येथे शवविच्छेदनसाठी राणीपुर ग्रामीण रुग्णालयात डॉ.सुभाष जगताप यांना आणलं. शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज खर्डे यांनी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे करीत आहे.
मध्यरात्री लुटीचा थरार, सोने व्यापाऱ्याची ‘मर्सिडीज’ रोखली अन्…, पोलिसांकडून चोरट्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम
आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण
नंदुरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली. यावेळी गर्दीला पांगण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पण यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तापलं आहे. खरंतर नंदुरबारमध्ये आज आदिवासी समाजाच्या एका तरुणाच्या खून प्रकरणात शहरात बंदची हाक देण्यात आली. या खूप प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण हा मोर्चा अंतिम टप्प्यावर असताना अचानक मोर्चाला हिंसक वळण लागलं.

