Solapur Crime News : सोलापूरच्या अनमोल केवटे हत्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गाडीला कट मारल्याच्या कारणातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यातून अनमोलवर चाकू हल्ला झालेला. या प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अनमोल केवटे याला कार चालकाने सांगितलं होतं; उगीच वाद नको, तरीही…
बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली. त्यावेळी कट बसला नाही, पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का, असे म्हटले. त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर आडवी लावली. त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता. आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ, कशाला उगीचच वाद घालायचा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. समोरच्या जीपमधून ती माणसं खाली उतरली. त्यावेळी दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली. काही कळायच्या आतच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले. त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले, कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती, केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता, अशा शब्दात कारचालकाने आपली प्रतिक्रिया दिल्याची माहिती पुढे आली आहे.
लातूरमध्ये खून झालेल्या अनमोलबद्दल धक्कादायक माहिती उघड, हत्येआधी सोनालीसोबत काय बोलणं झालं होतं?
मुख्य आरोपी फरार
केवटे खून प्रकरणी फिर्यादीत चार जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेतील आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत बंधू मंथन मामडगे हे दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे एक, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी विष्णू मामडगे गुन्हेगारी वृत्ती असलेला क्रुझर जीपचा मालक आहे. विष्णू मामडगे यावर काही गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत. त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे, शुभम पतंगे, वैभव स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Pooja Gaikwad: गोविंद बर्गे प्रकरणात नवा ट्विस्ट, महत्त्वाचा कागद सापडला; पूजा गायकवाडच्या मावशीच्या नावे…
अनमोल केवटेचे शरद पवारांसोबत फोटो वायरल –
मृत अनमोल केवटे हा मूळ गाव मंद्रुप, जि. सोलापूरचा होता. अनमोल केवटे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबत अनमोल केवटे याचे सोशल मीडियावर फोटो आहेत. अनमोल केवटे यावर देखील सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मारामारी, खंडणी वसुली यासारखे गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या लातूर मेळाव्यासाठी गेला होता. अनमोल केवटे सोबत जखमी झालेली सोनाली भोसले ही देखील सोलापूरची आहे. सोनालीचे मूळ गाव अंत्रोली, ता दक्षिण सोलापूर जि. सोलापूर आहे. सोनाली विवाहित आहेत, त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून सोनाली भोसले ही भ्रष्टाचार निर्मुलन समितीत कार्यरत आहेत. लातूर मेळाव्यासाठी ती अनमोलसोबत गेली होती.

