• Wed. Jul 1st, 2026

    दादर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चार अल्प मुदतीचे अभ्यासक्रम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 18, 2025
    दादर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चार अल्प मुदतीचे अभ्यासक्रम – महासंवाद




    मुंबई, दि. १८ : क्रांतिवीर बाबू गेनू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर, आगार बाजार, वीर सावरकर मार्ग, मुंबई येथे १ ऑक्टोबर २०२५ पासून फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, टेक्निशियन, जूनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर हे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

    इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन लोकप्रिय अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दादर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed