मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक मोठी आग लागली. पालघर जवळील केळवे रोड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात आली. आग लागलेलं इंजिन डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. प्रवाशांनी घाबरून न जाता गाडीतून खाली उतरावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं. या घटनेमुळे गुजरातच्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसई विरारसह काही रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईहून वलसाड किंवा अगदी सुरत अहमादाबाद पर्यंत रोज अनेक व्यापारी अप-डाऊन करत असतात. ते आपापल्या नोकरी, व्यवसाय अशा विविध कमांसाठी रोज ट्रेनने ये-जा करत असतात. याशिवाय मुंबई उपनगरातील लाखो नागरीक लोकल ट्रेनने पश्चिम रेल्वेच्या मार्गाने प्रवास करत असतो. रात्री आठ वाजेच्या वेळी सर्वजण आपापली कामे आटोपून घरी जाण्यास निघालेलं असतात. अशावेळी अचानक अशाप्रकारची घटना घडल्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काहीसा परिणाम पडला आहे.
या घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाला गाडीच्या इंजिनाला लागलेली आग विझवण्याचे प्रथम प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर ते इंजिन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागेल. हे काम युद्ध पातळीवर करावं लागेल. कारण अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गाने जातात. तसेच यामुळे उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम पडू शकतो. त्यामुळे आता रेल्वे प्रशानापुढे मोठं आणि महत्त्वाचं आव्हान आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.
नाट्यमय घडामोडी, पाकिस्तानचे प्लेअर मॅचसाठी तयार, टीम बसमध्ये बसणार तेवढ्यात PCB चा फोन अन्… मोठ्या हालचाली
अशाप्रकारच्या घटनेवेळी कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. पण रेल्वे विभागाने तत्परता दाखवत गाडीचे डब्बे इंजिनपासून दूर केल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यानंतर आता डाऊनच्या दिशेला जाणारी वाहतूक सुरळीत करण्याची महत्त्वाची कामगिरी पश्चिम रेल्वे प्रशासनाला करावी लागणार आहे.

