Solapur Pooja Gaikwad : कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी बार्शी तालुक्यात आयुष्याचा शेवट केला. त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तीन रील पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिने कोणतीही पोस्ट न केल्याचं आढळलं आहे. या घटनेमुळे बर्गे कुटुंबीय आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपांच्या अनुषंगाने पूजाकडून सखोल चौकशी केली जात आहे.
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भलेमोठे खिळे, एकामागे एक वाहनं पंक्चर; चौकशीत मोठं कारण समोर
पूजा गायकवाडचं शेवटचं रील हे एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर आहे, कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावर नाचताना ती या रीलमध्ये दिसत आहे. तिने शेवटचं रील एक दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे. यापूर्वी देखील तिने तिचे नाचतानाचे आणि इतर व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावरती शेअर केलेले आहेत.
Pune Crime: आयुष कोमकर हत्याकांडानंतर पुणे पुन्हा गोळीबाराने हादरलं, ‘प्रशिक्षण घेतोय’ म्हणत गँगस्टरने धडाधड गोळ्या झाडल्या
पूजा गायकवाड कोण आहे?
21 वर्षीय पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील सासुरे गावातील आहे. दीड वर्षांपूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात जात होती. येथे गोविंद बर्गे आणि पूजाची भेट झाली. यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे आली. यादरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली. यावेळी गोविंद यांनी तिला पावणे दोन लाखांचा मोबाइलही भेट दिला होता.

